मनोरंजन

‘देवा श्री गणेशा’मालिकेत गणपती बाप्पाची दिसणार झलक

मुंबई- स्टार प्रवाहवर गणेश चतुर्थीपासून म्हणजेच २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘’या गणपती विशेष मालिकेची उत्सुकता चाहत्यांना आहे. गणपती बाप्पाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतच्या अलौकिक गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने उलगडणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनाच्या या संकट काळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. या मालिकेतल्या गणपती बाप्पाचं हे देखणं रुप डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे.

अद्वैत कुलकर्णी या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका साकारणार आहे. गणपती बाप्पाची भूमिका साकारायला मिळावी ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती आणि या मालिकेच्या निमित्ताने अद्वैतचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. गणपती बाप्पाप्रमाणेच अद्वैतला मोदक खायला खूप आवडतात. ‘देवा श्री गणेशा’या मालिकेच्या निमित्ताने सेटवर मोदकांची मेजवानी दररोज असते. सेटवर संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूट करतो. सुरुवातीला बाप्पाच्या रुपात तयार होण्यासाठी दोन तास लागायचे मात्र आता तासाभरात आमची टीम मला तयार करते असं अद्वैतने सांगितलं.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण ऐकल्या आहेत पण त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे.

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहीत नाही.

‘देवा श्री गणेशा’ या ११ भागांच्या विशेष मालिकेतून ११ ऐकलेल्या मात्र त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे. तेव्हा ११ भागांची ही विशेष मालिका नक्की पाहा २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close