देश विदेश

गिरीशचंद्र मुर्मू यांनी स्वीकारला ‘कॅग’चा कार्यभार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताच्या महालेखापरिक्षकाचा (कॅग) कार्यभार गिरीशचंद्र मुर्मू यांनी शनिवारी स्वीकारला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुर्मू यांना पद तसेच गोपनीयतेची शपथ दिली. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी मुर्मू यांनी कॅग मुख्यालय परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

गिरीशचंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल पदाचा बुधवारी राजीनामा दिला होता. याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने त्यांची भारताचे महालेखापरिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याआधीचे कॅग प्रमुख राजीव महर्षि यांची जागा मुर्मू यांनी घेतली आहे. १९७८ च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी महर्षि यांचा कॅगमधला कार्यकाळ ७ ऑगस्टला संपला होता. गिरीशचंद्र मुर्मू केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू-काश्मीरचे पहिले उपराज्यपाल ठरले होते. या पदावर त्यांनी ९ महिने काम केले. मूळच्या ओडिशातील सुंदरगड येथील असलेल्या मुर्मू यांनी बर्मिंघम विद्यापीठातून एमबीए केलेले आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल बनण्यापूर्वी ते वित्त मंत्रालयात खर्च विभागाचे सचिव होते.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close