मनोरंजन

rhea chakraborty property: म्हणे, सुशांतची हिच मालमत्ता माझ्याजवळ आहे, रियानं शेअर केले फोटो – rhea chakraborty shares sushant singh rajputs handwritten gratitude note,claims it is the only property she has of the actor

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून काल ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला.

चौकशीच्या दरम्यान रियाच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान रियाच्या वकिलांनी काही फोटो शेअर करत सुशांतच्या केवळ याच वस्तू आणि याची हिच संपत्ती रियाजवळ असल्याचं म्हटलं आहे. या वस्तूंमध्ये सुशांतनं रियासाठी लिहिलेली एक चिठ्ठी असून या चिठ्ठीमध्ये सुशांतनं रियासाठी भावुक अशा ओळी लिहिल्या आहेत. या चिठ्ठीमध्ये आयुष्यात आल्याबद्दल सुशांतनं रियाचे आभार मानले आहेत. त्यामुळं ही चिठ्ठी चर्चेचा विषय ठरतोय.

सुशांतनं लिहिलेली चिठ्ठी

सुशांतनं लिहिलेली चिठ्ठी

सतीश मानेशिंदे यांनी या चिठ्ठीतील रियाच्या टोपण नावाचा खुलासा केला आहे. तसंच हे अक्षरही सुशांतचं असल्याचं म्हटलं आहे. लिल्लू शौविक आहे, बेबू म्हणजे रिया तर सर हे रियाचे वडिल आणि मॅम म्हणजे रियाची आई, असं रियाच्या वकिलांनी म्हटलं आहे.

काय लिहिलंय या चिठ्ठीत?

मी माझ्या आयुष्यात खूष आहे
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल बेबूचे आभार
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल सरांचे आभार
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मॅमचे आभार
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल फजचे आभार

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close