पश्चिम महाराष्ट्र

करोना रोखण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ उपक्रम सुरू

पुन्हा घरोघरी जाऊन होणार आरोग्य तपासणी

पुणे – करोना संसर्ग रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय या संसर्गावर नियंत्रण अशक्‍य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे शहरातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या “मिशन झिरो पुणे’ उपक्रमाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप देशमुख व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.

मुंबईत धारावी आणि मालेगाव येथे “मिशन झिरो मोहीम’ राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुणे शहरात फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक भागात नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून त्यात, करोना संशयितांची जागेवरच रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट होईल. या मोहिमेअंतर्गत दिवसाला सुमारे 3 ते 5 हजार चाचण्या करण्याची क्षमता असून ती पूर्णपणे उपयोगात आणली जाणार आहे. त्यामुळे वेळीच संशयित अथवा करोनाबाधित सापडण्यास मदत होणार असून त्यांचे विलगीकरण केल्यास बाधितांची वाढती संख्या रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close