पश्चिम महाराष्ट्र

ऑगस्टची मुख्यसभाही ऑनलाइनच?

शासनाच्या उत्तराची पालिकेला प्रतीक्षा

पुणे – महापालिकेची ऑगस्टची मुख्यसभाही ऑनलाइनच होण्याची शक्‍यता आहे. जुलैच्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी करोना नियंत्रणाच्या पालिकेच्या कामावर आक्षेप घेत याप्रकरणी
चर्चेची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी लॉकडाऊनमुळे ऑगस्टच्या सभेत चर्चा करण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले होते. त्यासाठी शासनाला पत्र पाठवून विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पालिकेने राज्यशासनाला पत्र पाठले आहे. पण, शासनाकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे 5 ऑगस्टची मुख्यसभाही ऑनलाइन होण्याची चिन्हे आहेत.

करोनाचा पहिला बाधित सापडल्यानंतर दि. 23 आणि 24 मार्च रोजी महापालिकेच्या मुख्यसभा झाल्या. त्यानंतर लॉकडाऊनमुळे फक्‍त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एप्रिल, मे आणि जूनच्या मुख्यसभा घेण्यात आल्या. तर, जुलैची मुख्यसभा “गूगल मीट’वर घेण्यात आली. यावेळी काही नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली आणि चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, लॉकडाऊनमुळे तसेच सभेत गर्दी झाल्यास करोना पसरण्याच्या भीतीने महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना विनंती करत तहकूब केलेल्या सभेत चर्चा करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी राज्यशासनास पत्र पाठवून ऑगस्टमध्ये होणाऱ्या या मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यसभा पुन्हा घेण्याबाबत राज्य शासनास पत्र पाठवले आहे. त्यावर उत्तर आलेले नाही. शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसारच मुख्यसभा घेतली जाईल. करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. अशा स्थितीत नगरसेवकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

The post ऑगस्टची मुख्यसभाही ऑनलाइनच? appeared first on Dainik Prabhat.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close