देश विदेश

‘एक देश-एक कार्ड’ योजनेत चार राज्यांचा समावेश

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील २४ राज्यात ‘एक देश-एक रेशन कार्ड’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी यासंबंधी माहिती दिली. १ ऑगस्टपासून नवीन चार राज्यांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. योजने अंतर्गत रेशन कार्ड धारक देशात कुठल्याही राज्यात कार्डाचा वापर करू शकतील. 

या व्यवस्थेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शिधापत्र धारकाला देशातील या २४ राज्यांतील कुठल्याही रेशनिंग दुकानातून धान्य माफक दरात विकत घेता येईल. 

ट्विटरवरून माहिती देताना रामविलास पासवान म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये वन नेशन, वन रेशनकार्ड ही योजना राबवण्यात येणार आहे. आता या रेशनकार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा २४ राज्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.’

आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, हिमाचलप्रदेश, दीव आणि दमन या १७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ ही योजना यापूर्वीच लागू करण्यात आली होती. यानंतर १ जून पासून यात ओडिशा, मिझोरम आणि नागालँड या राज्यांचा ही समावेश करण्यात आला. आता १ ऑगस्टपासून उत्तराखंड, नागालँड आणि मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यांमधील नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close