देश विदेश

बनावट बिले बनवून फसवणूक; नौदलाच्या चार अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा 

आयटी हार्डवेअर पुरवठ्याची बनावट बिले बनवून तब्बल ६ कोटी ७६ रुपयांची फसवणूक करणार्‍या नौदलाच्या वेस्टर्न कमांडच्या चार अधिकार्‍यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्‍यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असल्याची माहिती सीबीआय सूत्रांकडून बुधवारी देण्यात आली. जानेवारी आणि मार्च २०१६ मध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुंबई येथील कार्यालयात बनवेगिरीचा हा प्रकार घडला आहे. 

ज्या अधिकार्‍यांविरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत, त्यात कॅप्टन अतुल कुलकर्णी, कमांडर मंदार गोडबोले, कमांडर आर. पी. शर्मा तसेच पेटी ऑफिर एलओजी कुलदीप सिंग बघेल यांचा समावेश आहे. संगनमत करुन या चौघांनी ७ कोटी ७६ लाख रुपयांची बनावट बिले तयार केली होती. पदाचा आणि अधिकाराचा वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप या चौघांवर ठेवण्यात आला आहे. 

वाचा : केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिल्लीत डिझेल झाले साडेआठ रुपयांनी स्वस्त

बिले सादर करताना मंजुर्‍या, वित्‍तीय परवानगी, परचेस ऑर्डर, रिसिट व्हाऊचर अशी कोणतीही अनुषांगिक कागदपत्रे दाखल करण्यात आली नव्हती. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुंबई येथील मुख्यालयात हा प्रकार घडला होता.

वाचा : बनावट बिले बनवून फसवणूक; नौदलाच्या चार अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

दरम्यान, सीबीआयने कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्सच्या चार अधिकार्‍यांसह स्टार नेटवर्क, अ‍ॅक्मे नेटवर्क्स, सायबरस्पेस इन्फोव्हिजन आणि मोक्क्ष इन्फोसिस या कंपन्यांविरोधातही विविध आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close