पश्चिम महाराष्ट्र

करोनामुळे चोरट्यांचेही ‘पीपीई किट’

पुणे – चोरट्यांनी आता करोनाची धास्ती घेतली आहे. चोरीच्या वेळी ते पीपीई किटचा वापर करून लागले आहेत. या चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. पोलिसांची यात पंचाईत झाली असून डॉक्‍टर की चोर, हे ओळखणेही कठीण जाऊ लागले आहे. यातून तपासकामातील अडचणी वाढल्या आहेत.

पाषाण येथे पीपीई किट परिधान करून चोरट्यांनी एकाच रात्रीत 4 दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. एका दुकानातून त्यांनी 15 हजार रुपये लंपास केले. यावेळी दुकानातील सीसीटीव्हीमध्ये शिरलेले चोरटे हे कैद झाले. यावरून चोरट्यांनीही पीपीई किटने संपूर्ण शरीर झाकलेले आणि तोंडाला मास्क लावल्याचे आढळून आले. त्यामुळे आता पोलिसांना या चोरट्यांची चेहरेपट्टी मिळू शकलेली नाही. आता बॉडी लॅंग्वेजवरून त्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी अनिल सोहनलाल आगरवाल (वय 51, रा. बाणेर) यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. आगरवाल यांचे पाषाण येथील आकाश कॉम्प्लेक्‍समध्ये आगरवाल सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. 30 जून रोजी त्यांनी रात्री 6 वाजता दुकान बंद केले. त्यानंतर 1 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले. त्यादरम्यान चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानाच्या काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील 15 हजार रुपये चोरून नेले. त्याचप्रमाणे दिनेश सयाराम चौधरी यांचे उत्तम सुपर मार्केट स्टोअर्स, प्रकाश ओमपुरी गोस्वामी यांचे हरिओम सुपर मार्केटमध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

पाषाण येथील बालाजी सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तीनही दुकानातून चोरट्यांना काहीही रोकड मिळू शकली नाही. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत. चोरट्यांनी पाषाणमधील तीन दुकाने फोडल्यानंतर ते दिनेश चौधरी यांच्या उत्तम सुपर मार्केटचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. चोरट्यांचा आवाज ऐकून आत झोपलेले कामगार जागे झाले. तेवढ्यात चोरटे शटर वाकवून आत जाऊ लागले. आतमध्ये कामगार पाहून चोरटे पळून गेले. आत, कामगार असल्याने चोरी टळली.

The post करोनामुळे चोरट्यांचेही ‘पीपीई किट’ appeared first on Dainik Prabhat.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close