देश विदेश

पीएम मोदींच्या थेट लडाख दौऱ्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया..

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्राधान नरेंद्र मोदींनी आज (दि.3) लेहमधून विस्तारवादी चीनला कडक शब्दात संदेश दिला. त्यावर चीनने प्रतिक्रिया दिली असून चीनच्या भारतातील दुतावासाचे प्रवक्त्यांनी ट्विट करुन पंतप्रधानांचे चीनला विस्तारवादी म्हणणे हे तथ्यहीन असल्याचे सांगितले. दूतावासाने ‘चीनबरोबर सीमा शेअर करणाऱ्या आपल्या 14 पैकी 12 शेजारी देशांशी शांततापूर्ण मार्गाने वाटाघाटी करत, जमिनी सीमांचे रुपांतर मैत्रीपूर्ण सहकार्याच्या धाग्यात केले आहे. चीनकडे विस्तारवादी म्हणून पाहणे हे तथ्यांना धरुन नाही. ते अतिशोयोक्ती आणि शेजाऱ्यांबरोबरच्या वादाबाबत छेडछाड करणारे आहे.’ असे ट्विट केले. 

चिनी ऊर्जा उपकरणांच्या आयातीला ब्रेक लागणार

दरम्यान, आज पंतप्रधान नरेद्र मोदींनी लेहमधील निमू भागात तैनात असलेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चीनवर अप्रत्यक्ष टीका करत विस्तारवादाचे दिवस आता संपले आहेत आणि विकासाचे युग आले आहे असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी जवानांचे मनोबल वाढवताना ‘लेह, लडाख पासून सियाचीन आणि कारगील गलवानच्या बर्फाळ पाण्यापासून प्रत्येक डोंगराचे प्रत्येक शिखर भारतीय सैनिकांच्या शौऱ्याचा साक्षीदार आहे. विस्तारवादाचा काळ आता संपला आहे. विकासाचे जग सुरु झाले आहे. इतिहास साक्षी आहे की विस्तारवादी शक्तींचा पाडाव तरी झाला आहे किंवा त्यांना माघार तरी घ्यावी लागली आहे.’ असे म्हणाले होते. 

‘इंदिरा गांधी लेहला गेल्या तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, बघुया मोदी काय करतात’

यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय शूर जवानांना आदरांजली वाहत प्रत्येक भारतीय शांततेत जगत आहे कारण त्यांना माहिती आहे की आपले सशस्त्र दल देशाच्या सुरक्षेसाठी पाय रोवून सीमेवर उभे आहे. असे म्हणाले. 

विस्तारवादाचं युग संपलंय; पंतप्रधान मोदींचा लडाखमधून चीनला इशारा

पंतप्रधानांनी आज सकाळी अचानक लडाखला भेट दिली आणि चीन बरोबर सुरु असलेल्या निमू येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे हे देखील होते.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close