मनोरंजन

sadak 2 in legal trouble: हिंदूंच्या भावना दुखावल्या; महेश भट्ट आणि आलियाविरोधात गुन्हा दाखल – alia bhatt and mahesh bhatt accused of hurting religious sentiments sadak 2 in legal trouble

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट हिचा ‘सडक २’ हा चित्रपट या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा असंही म्हटलं जात आहे. आता चित्रपट आणखी एका वादाता सापडला आहे. चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणत आलिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच ‘सडक’ चित्रपटाचा ‘सडक २’ हा सिक्वल आहे.

‘सडक २’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी महेश भट्ट आणि आलिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ आणि१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून येत्या ८ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं असून आलियासोबत तिची बहिण पूजा भट्ट चित्रपटात दिसणार आहे. तसंच अभिनेता संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हिंदूंच्या भावना दुखावल्या
‘सडक २’ या चित्रपटाच्या पोस्टरवर कैलास मानसरोवर पर्वताचा फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोवर सडक २ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे. हिंदु धर्मात कैलास पर्वताला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान असून याला सडक असं नाव देण्यात आल्यानं आलिया आणि महेश भट्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close