देश विदेश

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

येत्या ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली जाणार नसल्याची माहिती हवाई वाहतूक महासंचलनाकडून (डीजीसीए) शुक्रवारी देण्यात आली. कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस १५ जुलैपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला होता. हा कालावधी वाढवून आता ३१ जुलै इतका करण्यात आला आहे.

वाचा : भारत-चीन सीमेवर तणाव असताना पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले लडाखमध्ये! (video)

काही आंतरराष्ट्रीय मार्गावर गरजेनुसार हवाई वाहतूक चालविली जात आहे. ही सेवा यापुढील काळात चालू राहील. तथापि सरसकट हवाई सेवेवर असलेला प्रतिबंध १५ जुलैऐवजी आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोना संक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सर्वप्रथम २३ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. 

वंदे भारत योजनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडिया तसेच काही अन्य खाजगी विमान कंपन्या ठराविक मार्गावर हवाई सेवा चालवित आहेत. विविध देशांमध्ये अडकलेल्या लोकांना परत देशात आणण्यासाठी तसेच भारतात अडकलेल्या विदेशी लोकांना परत त्यांच्या देशात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने ६ मे रोजी वंदे भारत योजना सुरू केली होती. विशेष म्हणजे अनलॉक योजनेचा भाग म्हणून देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा गेल्या २५ मे रोजी सुरु करण्यात आली होती.

वाचा : ‘इंदिरा गांधी लेहला गेल्या तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, बघुया मोदी काय करतात’

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close