देश विदेश

त्यामुळे पाकिस्तानला भरली धडकी! | पुढारी

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि चीनच्यामध्ये सध्या सीमावादावरून धुसफूस सुरू आहे. मात्र या घटनेने पाकिस्तानला चांगलाच धक्का बसलेला दिसत असून तेथे भीतीचे वातावरण बनले आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पाकिस्तान आणि भारताच्या नियंत्रण रेषेवरही (पीओके) त्याचे पडसाद उमठू शकतात. याच भीतीने पाकिस्तान लष्करप्रमुखांनी नवीन आदेश जारी केला आहे. जनरल जावेद बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) आरोग्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके)  तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड सैन्यासाठी राखीव ठेवावेत. तर ५० टक्के रक्तपुरवठाही पाकिस्तानी सैन्यासाठी राखीव ठेवण्यास सांगितले आहे.

‘घुसखोरी नाही, तर २० जवान शहीद कसे झाले?’

पत्रावरून वाटते पाकिस्तान घाबरले आहे

कृपया पाकिस्तान सैन्य दलासाठी सर्व रूग्णालयात नेहमीच ५० टक्के बेड राखीव ठेवा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत लक्षात घेता रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठाही ठेवण्यात यावा असे जनरल बाजवा यांनी पीओकेचे आरोग्यमंत्री डॉ. मुहम्मद नजीब नाकी खान यांना पत्रात लिहिले आहे. विशेष बाब म्हणजे जनरल बाजवा यांनी हे पत्र अशा वेळी लिहिले आहे. जेव्हा पूर्व लडाखमधील भारत आणि चीनचे सैन्य अतिशय तणावपूर्ण वातावरणात एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यातच एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने युद्धबंदी आदेशाची पायमल्ली केली जात आहे.

त्रालमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

सीमेवर लष्कराच्या सक्रियतेने पाकिस्तानला भीती?

सध्या काश्मीर खोऱ्यातून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाचे जवान गुंतले आहेत. आजच (दि.२६) त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीरमध्ये दररोज अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी होत असतात. यावर्षी, जितके दहशतवादी भरती झाले नसतील त्यापेक्षा अधिक ठार झाले आहेत. दुसरीबाब म्हणजे सीमेपलीकडून दररोज गोळीबार होत असतो. अलीकडच्या दोन महिन्यात चीन आणि भारत यांच्यात तणाव वाढल्यामुळे पाकिस्तानही सतर्क झाला आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी ज्याप्रमाणे चीनच्या हल्ल्याचा केवळ प्रतिकारच केला नाही, तर त्यांना चोख प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला आहे. 

अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, एका मुलाचाही मृत्यू

पाकिस्तानला गलवानच्या बाबतीत माहिती असणारच 

१५-१६ जूनच्या रात्री बिहार रेजिमेंटच्या जवानांनी पीपल्‍स लिब्रेशन आर्मी (PLA) च्या जवानांना जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. पेट्रोलिंग पॉईंट १४ च्या जवळ चीनी सैन्याने तंबू उभारले होते. जे युनिट कमांडर कर्नल संतोष बाबू यांनी उपटून टाकले. त्यानंतर चीनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला. या हिंसक चकमकीत कर्नल संतोष बाबूंसह २० भारतीय जवान शहीद झाले होते. तथापि, चीनच्या छावणीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी जो तांडव केला त्याची माहिती पाकिस्तानलाही झाली असावी. मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या चकमकीत १०० भारतीय सैनिक आणि ३५० चीनी सैनिक आमनेसामने आले होते. असे असूनही, बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी पेट्रोलिंग पॉईंट १४ चीनींकडून मोकळे करूनच घेतले. 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close