देश विदेश

देशात कोरोना बाधितांच्या आकड्यात विक्रमी वाढ!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्गाचे संकट देशात दाहक रुप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा चिंतेत भर घालणारा ठरत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवार (ता.२६) दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी देशात उच्चांकी १७ हजार २९६ कोरोनाबाधित आढळून आले. तर, ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला. 

देशातील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ४ लाख ९० हजार ९०१ वर पोहचली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी १ लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. दुदैवी बाब म्हणजे देशात आतापर्यंत १५ हजार ३०१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

जगाच्या ५.१५ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत देशाचा मृत्यूदर त्यामुळे ३.१२ टक्के तर महाराष्ट्राचा ४.६९ टक्के नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी उच्चांकी १३ हजार ९४० कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. देशातील कोरोनामुक्तीचा दर त्यामुळे ५८.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.  

गेल्या एका दिवसात महाराष्ट्रासह (४,८४१), दिल्ली (३,३९०), तामिळनाडू (३,५०९), गुजरात (५७७), उत्तर प्रदेशात (६३६) सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले. या राज्यांसह राजस्थान (२८७), पश्चिम बंगाल (४७२), मध्यप्रदेश (१४८), हरियाणा (४५३), तेलंगाणा (९२०), आंधप्रदेश (५५३) तसेच कर्नाटक (४४२) मध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद घेण्यात आली.गुरुवारी दिवसभरात देशातील जवळपास २ लाख १५ हजार ४४६ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तर, आतापर्यंत देशातील ७७ लाख ७६ हजार २२८ नागरिकांच्या कोरोना संबंधी तपासण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) कडून देण्यात आली आहे.

मुंबई, दिल्लीत कोरोनाचा विळखा तीव्र आहे. दरम्यान सर्वत्र कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३,३५७ वर पोहचला असून ७७ हजार ४५३ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर ६ हजार ९३१ कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ५ लाख ५६ हजार ४२८ नागरिक हे घरगुती विलगीकरणात, तर ३३ हजार ९५२ नागरिक हे संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात गुरुवार पर्यंत  ८ लाख ४८ हजार २६ जणांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून यातील १ लाख ४७ हजार ७४० नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला

अनलॉक-१ च्या माध्यमातून सेवा-सुविधा पुन्हा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात २८ जून पासून सलून व्यवसाय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र १२ ऑगस्ट पर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली असून लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

ईशान्येकडील राज्यांना विशेष मदत 

ईशान्य भारतातील राज्यांना कोरोनासंबंधी केंद्र सरकारकडून विशेष मदत करण्यात आली आहे. केंद्राकडून या राज्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई), एन-९५ मास्क तसेच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन च्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार अरुणाचल प्रदेश (१.२१ लाख) , असम (३.३७ लाख), मणिपूर (९५ हजार), मेघालय (७५,०००), मिझोरम (७६,०००), नागालॅंन्ड (७०००), सिक्किम (८००००) तसेच त्रिपुराला (१.३८ लाख) एन-९५ मास्क चा पुरवठा करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण

राज्य          कोरोनामुक्त 

महाराष्ट्र       ७७,४५३

दिल्ली         ४४,७६५ 

तामिळनाडू   ३९,९९९

गुजरात         २१,४९८ 

उत्तरप्रदेश     १३,११९

राजस्थान       १२,८४० 

पश्चिम बंगाल   १०,१९०

मध्यप्रदेश       ९,६१९

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close