देश विदेश

चीन दूतावासासमोर ‘हिंदी-चीनी बाय-बाय’, ‘गद्दार’ अशी पोस्टरबाजी

नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना धोकेबाजीने मारले होते. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून हिंदू सेनेकडून दिल्लीतील चीन दूतावासासमोर ‘हिंदी-चीनी बाय-बाय’, ‘गद्दार’ अशी पोस्टरबाजी मंगळवारी (दि. २३) रोजी करण्यात आली.

वाचा : ताहीर हुसेनच्या ठिकाणांवर ईडीचे छापे 

गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चीनने केलेल्या धोकेबाजीत बिहार रेजीमेंटच्या २० सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून देशातील चीनविरुद्धचा संताप वाढत चालला आहे. चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहीम ठिकठिकाणी सुरू झाली आहे. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिल्‍लीतील चीनी दूतावासासमोर तीव्र निदर्शने केली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी चीन दूतावासाच्या फलकावर ‘हिंदी-चीनी बाय-बाय’ आणि ‘गद्दार’ असे पोस्‍टर लावण्यात आले.

वाचा : इंडोनेशिया पाठोपाठ भारताचाही हज यात्रेसाठी नकार

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close