Uncategorized

मुख्यमंत्री बदलासाठीच सरकार अस्थिरतेचे काळे ढग ?

मुबंई  –  राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार वर अस्थिरतेचे काळे ढग तयार झालेत अशी चर्चा राजकीय विश्लेषण पत्रकार करताना दिसत आहे. पण या चर्चा का होतायत? मुद्दाम या चर्चा घडवून तर आणत नाही ना? या दोन्ही बाबींचा विचार कराव करावा लागेल.

काँग्रेस हायकमांडच्या कोअर टीम मधले असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात हे सरकार काँग्रेसचे नाही हे सरकार शिवसेनेचे आहे पृथ्वीराज यांची री ओढत
राहूल गांधी यांनी ही महाविकास आघाडीत काँग्रेसला धोरणात्मक निर्णयात विचारात घेतले जात नाही असे सांगीतले.

येत्या काळात मुख्यमंत्री उद्धव यांच्या कोरोना स्थिती हाताळण्याच्या कारभाराव बोट ठेऊन येत्या काळात कदाचित काँग्रेस महाविकास आघाडीचा म्हणजेच उद्धव यांचा पाठींबा काढून घेऊ शकते यांचा जाणिवपूर्वक संशय निर्माण केला गेला.?

कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी होत आहे म्हणून विरोधी पक्ष असलेला भाजप नेते राज्यपालशी जाऊन भेटतात त्यांना निवेदन देतात या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षमतेवर खापर फोडले जाते, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणून वातवरण तयार केले जाते.

या सर्व प्रकरणात महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार हे संजय राऊत यांच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मध्यरात्री २ वाजता मातोश्री वर जातात व यानंतरच हे महाविकास आघाडीचे सरकार पडणार की टिकणार यांच्या डीबेट पद्धतशीर न्यूज चॅनल वर सुरू होतात.

मध्यंतरी राजकीय घडामोडी विषयावर सुधीर सूर्यवंशी ,कमलेश सुतार आणि जितेंद्र दिक्षित यांची पुस्तक प्रसिद्ध झालेत या पुस्तकातून अजित पवार यांच्या बंडाबाबत वेगवेगळे कारण आहेत त्यापैकी एक अस आहे की महाविकास आघाडीत सुप्रीया सुळे या मुख्यमंत्री
होणार होत्या म्हणून बंड केले.

या पुस्तकांच्या निमित्ताने एका विशिष्ट राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री बदलासाठी कोरोना संकट हातबाहेर जात आहे जनक्षोभाचे कारण पुढे करून दबाव टाकून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर सरकार वर अस्थिरतेचे काळे ढग जमा झाल्याच्या चर्चा घडून आणल्या जात तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे?

लेखक – समाधान वाघमारे, राजकीय विश्लेषक व मुक्त पत्रकार

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close