पश्चिम महाराष्ट्र

Pune Molestation: तरुणीला भररस्त्यात अडवून कानाखाली मारली; अॅसिड फेकण्याची दिली धमकी – pune young girl allegedly molested by man in pashan

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फोन न उचलल्याच्या कारणावरून तरुणीला भर रस्त्यामध्ये थांबवून, मारहाण करून तिचा विनयभंग केला. तसेच, तरुणीला तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पाषाण परिसरात घडला. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत १८ वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अक्षय पवार नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी व आरोपीची ओळख आहे. तक्रारदार तरुणी ही पाषाण परिसरातून जात होती. त्या वेळी आरोपी रिक्षातून त्या ठिकाणी आला. आणि तरुणीला अडवून, ‘तू माझे फोन का उचलत नाही,’ असे म्हणून तिच्या कानाखाली मारली. तसेच, तिचा विनयभंग केला. त्यानंतर या पुढे बाहेर कुठे दिसली तर अॅसिड फेकण्याची धमकी तरुणीला दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गर्भवती महिलेने कुऱ्हाडीने वार करून केली पतीची हत्या

येरवडा जेलबाहेर कैद्यांच्या स्वागताला गर्दी; पोलिसासह ८ अटकेत

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close