मनोरंजन

सुनील ग्रोवर रत्नागिरी: लॉकडाउनमध्ये सुनील ग्रोवरचा रत्नागिरी अवतार, ब्रेकअपचं सांगितलं दुःख – sunil grover ratnagiri look andd share funny video on breakup

मुंबई- विनोदवीर सुनील ग्रोवरने लॉकडाउनमध्ये त्याच्या चाहत्यांना खळखळून हसवण्याचा निश्चय केला आहे. तो सोशल मीडियावर कधी मजेशीर व्हिडिओ शेअर करतो तर कधी स्वतःचेच मीम्स तयार करतो. नुकताच सुनीलने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. आतापर्यंत सुनीलला प्रेक्षकांनी रिंकू भाभी, डॉक्टर मशहूर गुलाटी या भूमिकेत पाहिलं आहे. पण पहिल्यांदा त्याने याहून वेगळी भूमिका साकारली आहे.

अजून बरंच काही कळेल, नवाजच्या पत्नीची प्रतिक्रिया

या व्हिडिओत त्याने साकारलेल्या मुलीचं नाव रत्नागिरी असं आहे. यात त्याने केसांचा विग लावला आणि डोक्याच्या मधोमध पोनी बांधली आहे. गुलाबी रंगाचा टॉप घातलेल्या सुनीलने लिपस्टिकही लावली आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘केतन, मी तुझा द्वेष करते. प्रेम आंधळं असतं पण मी नाही. आपल्या दोघांमधलं जे नातं होतं ते संपुष्टात आलं आहे.’


व्हिडिओमध्ये सुनील म्हणतो की, ‘आता माझं डोकं दुखतंय. काल रात्री मी केतनसोबतचं नातं तोडलं. मी त्याच्याकडे मागितलंच काय. मला स्वयंपाक करायचा होता तर मी त्याला ब्लू बेरीज आणायला सांगितले.’

नवाजच्या पुतणीने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप

मनुक्यांनी तोडलं नातं-

‘तो बोलला की ब्ल्यू बेरीज लॉकडाउननंतर आणून देऊन. अरे पण लॉकडाउननंतर मीच जाऊन आणू शकत नाही का. केतन मला म्हणाला की मनुके वापर. श्रीमंताचा मुलगा.. मी आता थकली आहे.’

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close