पश्चिम महाराष्ट्र

Pune murder: पुणे खुनाच्या घटनांनी हादरलं; शहर प्रचंड दहशतीखाली – seven murders in pune city in a week

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यांत खुनाच्या सात घडल्या आहेत. या खुनाच्या घटनांमध्ये किरकोळ, कौटुंबिक वाद व पूर्ववैमनस्य असल्याचे दिसून आले आहे. या घटनांमुळे शहर हदरले आहे.

करोनामुळे शहरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या गुन्हेगारीत मोठी घट झाली होती. किरकोळ स्वरूपाचे दररोज एक ते दोन गुन्हे घडत होते. मात्र, चौथ्या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले. त्यानंतर अचानक गुन्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शहर खुनाच्या घटनांनी हादरून गेले आहे. येरवडा भागात किरकोळ वादातून केटरिंग व्यावसायिक प्रतीक वन्नाळे याचा खून झाला. हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वर्चस्वाच्या वादातून बसवराज कांबळे याचा खून झाला होता. त्यानंतर येरवडा भागात आणखी एका सराईताच्या खुनाची घटना घडली. तीन दिवसांपूर्वीच कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा खून झाल्याची घटना घडली होती. भवानी पेठेतून मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलेचा वानवडी परिसरात खून झाल्याचे उघड आले होते. मात्र, या खुनातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. सोमवारीदेखील कोंढवा परिसरात बबलू सय्यद याच्या खुनाची घटना घडली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. यापैकी काही खून स्थानिक वाद आणि वर्चस्वात घडल्याचे समोर येत आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पाठोपाठ खुनाच्या घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. करोनाच्या बंदोबस्तात व्यग्र असणाऱ्या पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकडे आता अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

तरुणीला भररस्त्यात अडवून कानाखाली मारली; अॅसिड फेकण्याची दिली धमकी

पाच महिन्यांत २६ खून

गेल्या पाच महिन्यांत शहरात खुनाच्या २६ घटना घडल्या. गेल्या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये २७ खून झाले होते. २०१९मध्ये जानेवारी महिन्यात पुण्यात खुनाच्या १३ घटना घडल्या होत्या. जनता वसाहत येथे टोळी युद्धातून घडलेल्या खुनानंतर पुढील २० दिवसांत शहरात १२ खून झाले होते. यंदा इतर सर्व गुन्हे घटले असले, तरी खुनाचे गुन्हे गतवर्षी एवढेच आहेत. या वर्षी लॉकडाउनच्या अगोदर १४ खुनाच्या घटना घडल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात १२ खून झाले आहेत. त्यापैकी सहा घटना गेल्या आठवड्यात घडलेल्या आहेत.

गर्भवती महिलेने कुऱ्हाडीने वार करून केली पतीची हत्या

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close