पश्चिम महाराष्ट्र

pune news News : मान्सूनपूर्व पावसाने शहराला झोडपले – pre-monsoon rains lashed the city

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचे पडसाद मंगळवारी मध्य महाराष्ट्रात उमलटले. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूरला मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. तसेच, पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये दिवसभर रिपरिप आणि संध्याकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

शहरात गेल्या आठवड्यापर्यंत तापलेले वातावरण आता निवळले असून, मान्सूनच्या आगमनाचे नागरिकांना वेध लागले आहेत. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाळा संपला आणि आता नवीन ऋतू सुरू होणार असल्याचे संकेत दिले. वातावरणातील नव्या घडामोडींमुळे राज्याच्या विविध भागांत मंगळवारीही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

पुण्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. गार वाऱ्यांमुळे उकाडा कमी झाला होता. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी पडल्या. सोमवारी कमाल तापमान ३८ अंशावरून २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मंगळवारी यामध्ये थोडी वाढ झाली. शहराच्या सर्वच भागात दिवसभर ढग दाटून आले होते. दुपारी मेघगर्जना झाली; पण पाऊस पडला नाही. संध्याकाळी सहानंतर काळोख पसरला आणि सातनंतर शहराच्या सर्वच भागात पावसाची मोठी सर आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शहरात दिवसभरात २१.४ अंश सेल्सिअस किमान आणि ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. चोवीस तासांत तीन मिलिमीटर पाऊस पडला.

येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

पुण्यात पुढील दोन दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close