मनोरंजन

सुवेधा देसाई लग्न: लॉकडाउनमध्ये मराठी अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न, शेअर केले फोटो – marathi actress suvedha desai tie the knot with director sagar gaonkar

मुंबई- लॉकडाउनमध्ये अनेक मोठ्या समारंभांना मनाई असली तरी अनेक जोडपी साध्या पद्धतीने आणि घरच्यांचा उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडत आहेत. याच यादीत आता वैजू नंबर वन मालिकेतील अभिनेत्री सुवेधा देसाईचं नावही सहभागी झालं आहे. सुवेधाने १ जूनरोजी सागर गावकरशी लग्न केलं. स्वतः सुवेधाने तिच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गोड बातमी दिली.

मराठी अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन!


लॉकडाउनमध्ये लग्न सोहळ्यांवर बंदी असल्यामुळे सुवेधाने रितसर परवानगी घेऊन लग्न केलं. लग्नाच्यावेळी वर-वधूंनी चेहऱ्याला मास्क लावलं होतं. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही काळजी यावेळी घेण्यात आली. याचमुळे सुवेधा आणि सागरच्या लग्नाला घरातली मोजकीच माणसं उपस्थित होती. वधू-वरांप्रमाणेच इतर लोकांनीही चेहऱ्यावर मास्क लावलं होतं आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करत होते.

त्यांनी देवघरात ठेवला सोनू सूदचा फोटो, दररोज होते आरती


सुवेधा देसाईने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत किंजलची व्यक्तीरेखा साकारली होती. याशिवाय सध्या ती वैजू नंबर वन मालिकेत दाक्षिणात्य मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तर सागर गावकर हा लेखक- दिग्दर्शक असून त्याने सुवासिनी मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close