पश्चिम महाराष्ट्र

coronavirus pune: करोनाः पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यू – coronavirus pune update 27 corona patient dead in last 24 hours

पुणेः पुणे शहरात करोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्येचा यापूर्वी उच्चांक होऊन गेला. आता मृत्युच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. चोवीस तासात पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २५ जणांचा तर पिंपरी चिंचवडमधील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने शहर जिल्ह्यांत २७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३७४ मृत्यू झाले. मृतांमध्ये अन्य आजार असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असून त्याशिवाय केवळ करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. सर्वाधिक कमी ४३ वयातील तर सर्वाधिक ८६ वयातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने आता पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तसेच शहर जिल्ह्यात ३०८ जणांना लागण झाल्याने रुग्णसंख्येने आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

पुणे शहर जिल्ह्यात मंगळवारी ३०८ जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये पुण्यात २५६, पिंपरी चिंचवडमध्ये ३१ तर पुणे ग्रामीणमध्ये १३ तसेच पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत ८ रुग्णांना लागण झाल्याची नोंद झाली. त्यामुळे पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ८१३४ पर्यंत पोहोचली आहे.

उपमहापौरांना सोडले; वरिष्ठ निरीक्षक, फौजदाराचा चौकशी अहवाल सादर

पुण्यात १६५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी ३५ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर १६९ जणांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४११९ पर्यंत पोहोचली आहे. तसेच पुण्यात २३३१ जण सध्या उपचाराखाली आहेत.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close