मनोरंजन

bollywood news News : हुड दबंग…दबंग गातानाचा वाजिद यांचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ व्हायरल – composer wajid khan hospital video viral on social media singing ‘hud hud dabangg’

मुंबई: बॉलिवूडमधले सध्याचे आघाडीचे संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. ते ४२ वर्षांचे होते. वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. दरम्यान, वाजिद यांचा हॉस्पिलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हॉस्पिटलमधल्या या व्हिडिओत वाजिद बेडवर बसलेले दिसतायत.’ मी माझा भाऊ साजिदसाठी एकच गाणं गाणार …त्यानंतर ते‘दबंग’ चित्रपटातील गाणं गाताना दिसतात. बाजूच्या बेडवरील रुग्ण देखील ऐकून आनंदी होताना दिसतात.शेवटपर्यतं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर त्यांनी हास्य फुलवलं. पण त्यांच्या हा व्हिडिओ शेवटचा ठरला.

वाजिद यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’ यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीने ‘एक था टायगर’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘दबंग ३’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.

साजिद-वाजिद
साजिद-वाजिद जोडगोळीचा नेहमीच बॉलिवूडमध्ये दबदबा राहिला. टीव्हीवरील प्रसिद्ध ‘सारेगमप २०१२’, ‘सारेगमप सिंगिंग सुपरस्टार’ शोसाठी या जोडीने परीक्षक म्हणून काम पाहिले होते. आयपीएल-४ चं थीम सॉंग ‘धूम धूम धूम धडाका’ याच जोडगोळीने संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं वाजिद यांनी गायलं होतं. वाजिद यांच्या निधनाने अनेक हिट गाणी देणाऱ्या साजिद-वाजिद या दोन भावांची ताटातूट झाली आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत अली खान हे त्यांचे वडील होते.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close