पश्चिम महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्‍त सदस्य; पुण्यातून ‘या’ 6 नावांची शिफारस

पर्यावरणविषयक प्रश्‍नांना फुटणार वाचा… 

पुणे – पर्यावरणविषयक प्रश्‍नांना योग्य न्याय मिळावा, यासाठी विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्‍त सदस्यासाठी पुण्यातील सहा विषयतज्ज्ञांच्या नावांची शिफारस केली आहे. यासंदर्भात नुकतेच राज्यपालांना शिफारसपत्र पाठवल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक शैलेंद्र पटेल यांनी दिली. 

राज्यातील पर्यावरणीय प्रश्‍नांकडे कोणत्याही राजकीय नेत्याकडून गांभीर्याने विचार केला जात नाही. याबाबतची उदासीनता दूर व्हावी आणि या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविता यावे, यासाठी विधान परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यपालांनी निवड करावी, अशी मागणी होत आहे.

यासाठी पुण्यातील सहा विषयतज्ज्ञांची नावे सूचवली आहेत. यामध्ये डॉ. सचिन पुणेकर, शैलेंद्र पटेल, सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर, उपेंद्र धोंडे, डॉ. अनुपम सराफ, डॉ. हिंमांशू कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close