Life Style

सुदृढ हृदयासाठी रोज प्या ‘आवळा’ रस

पुणे – आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला नेहमीच्या वापरातील फळे -फळभाज्या, पालेभाज्या, वनौषधींच्या रसाचा चांगलाच उपयोग होतो. फक्त अशा उपयुक्त रसांची आपल्याला माहिती असणे आवश्‍यक असते. त्यात कोणते घटक आणि जीवनसत्वे असतात आणि ते आरोग्याला कसे पूरक ठरतात हे समजावून घेऊन त्यांचा आपल्या आहारात जर समावेश केला तर आपण कायमच निरोगी राहू आणि जगण्यातला खरा आनंद उपभोगू शकतो…

आवळ्याचे फळ हिरवट, पिवळे व बाहेरून उभ्या रेषा असणारे असे असते. आवळ्याचा विशिष्ट मौसम असतो. ह्या फळात जितकी रोगनिवारक शक्‍ती आहे तितकी अन्य कोणत्याच फळात नाही. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले जीवनसत्त्व “सी’ आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते. कांती सतेज होण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. च्यवनप्राशावलेहामधे आवळ्याचे प्रमाण जास्त असते.

गुणधर्म- आवळ्यामध्ये “सी’ जीवनसत्व भरपूर असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यास आवळ्याची खूप मदत होते. आवळ्याचा स्वाद कडवट, तिखट, आंबट, तुरट आणि मधुर असतो. आवळा हा केशवर्धक, धातुवर्धक, दृष्टी सतेज करणारे, बलवर्धक, रक्‍तशोधक व त्रिदोषनाशक आहे. आवळा हा कोणत्याही तूत पथ्यकारक व आरोग्यवर्धक असतो.

घटक- आवळ्यामध्ये गॅलिक ऍसिड असते. आवळ्यामध्ये असणारे “सी’ जीवनसत्व फार काळ टिकते. उलट आवळे सावलीत सुकवले की त्यातील “सी’ जीवनसत्त्व वाढते. 100 ग्रॅम सुकवलेल्या आवळ्यात 2400 ते 2600 मि. ग्रॅम “सी’ जीवनसत्त्व असते. आपणास रोज 75 मि. ग्रॅम. “सी’ जीवनसत्वाची आवश्‍यकता असते. अगदी थोड्या आवळ्यातून माणसाची ही गरज पूर्ण होते.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close