अर्थविश्व

महिलांनो तुमच्यासाठी PNB ची खास स्कीम, टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी आता जबरदस्त ऑफर

पुणे : भारत देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने महिलांसाठी खास ऑफर आणली आहे. ती योजना म्हणजे पीएनबी पॉवर राइड योजना (PNB Power Ride) आहे. यामध्ये बँक अगदी कमी मासिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना बाईक, स्कूटर आणि मोपेड खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा करत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेला कमीतकमी 8000 रुपये मासिक पगार मिळत असेल तर ती सहजपणे दुचाकी किंवा स्कूटर खरेदी करू शकते. यासाठी पंजाब नॅशनल बँक त्यांना मदत करत आहे.

अर्ज करण्यासाठी या आहेत अटी 

तुमची नोकरी कमीतकमी सहा महिने पूर्ण झालेली असायला हवी. तसेच सेल्फ एम्प्लॉयड असल्यास तुमच्याकडे किमान एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. जर एखादी विद्यार्थी असेल तर ती पालकांना सहकारी अर्जदार बनवू शकते. या स्कीमसाठी तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त व 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे आणि आपल्याकडे वैध ड्राइविंग लाइसेंस (वाहन चालक परवाना) देखील असणे महत्वाचे आहे. 

इतके असावे उत्पन्न

जर तुमचे मासिक उत्पन्न 8000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला मागील तीन वर्षाची पेमेंट स्लिप व मागील वर्षाच्या फॉर्म 16 किंवा आयटीआरची प्रत द्यावी लागेल. तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर मागील वर्षाची आयटीआर प्रत बँकेला द्यावी लागेल.

इतकं मिळेल लोन 

या ऑफरमध्ये पंजाब नॅशनल बँक ही जास्तीत जास्त 60,000 रुपये वित्तपुरवठा (फायनान्स ) करण्यास सक्षम आहे. ही रक्कम आवश्यकतेनुसार असणार आहे. यामध्ये  शोरूमच्या किंमतीच्या दहा टक्के मार्जिन असणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 36 महिन्यांमध्येच कर्जाची परतफेड पूर्ण करावी लागेल. 

लोनसाठी इतके चार्ज द्यावे लागतात

या फायनान्स ऑफरअंतर्गत बँक आपल्या कर्जानुसार निश्चित व्याज, प्रोसेसिंग फी, दस्तऐवजीकरण शुल्क (डॉक्यूमेंटेशन चार्ज) आणि इतर शुल्काचे चार्ज घेते. या फायनान्स योजनेतून तुम्हाला बाईक किंवा स्कूटर खरेदी करायची हे एकदा तुम्ही ठरवल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन बँकेच्या अधिकाऱ्याकडून या योजनेबद्दल सविस्तर माहिती घ्या. त्यानंतर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कि नाही याचा निर्णय तुम्ही करू शकता.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close