मनोरंजन

bollywood news News : payal ghosh allegations:अभिनेत्रीचे अनुराग कश्यपवर गंभीर आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत – payal ghosh allegation on anurag kashyaps sexual misconduct i have no proof but it happened with me

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील काही नकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्री, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. असं असातना अभिनेत्रीनं दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं अनुरागवर आरोप केलेत. यासंदर्भात तिनं एक ट्विट देखील केलं आहे. ‘अनुराग कश्यप यान माझ्यासोबत असभ्य आणि गैरवर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली गेली होती. या व्यक्तीवर कारवाई करा. या माणसाचं खरं रुप सर्वांसमोर येईल. माझ्या या ट्विटमुळे माला जीवाला धोका असून माझी मत करा’, असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट करताना पायलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे आणि त्याच्याकडे मदत मागितली आहे.
वाचा:हृतिक रोशन आणि सुझान खान पुन्हा एकत्र येणार; ‘त्या’ पोस्टमुळे जौरदार चर्चा
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर अनुरागनं वेळोवेळी त्याचं मत मांडलं आहे. तसंच कंगना राणावत आणि अनुराग कश्यप याच्यात ट्विटवरवर शीत युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.

अनुरागने आरोप फेटाळले

पायल घोष हिनं केलेले सर्व आरोप अनुरागनं फेटाळले आहे. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस,शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत’, असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये आहे.
वाचा:‘याच’ अभिनेत्यानं माझी भूमिका साकारावी; सौरव गांगुलीनं व्यक्त केली ईच्छा
दरम्यान, अद्यापही पायलनं अनुराग विरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाहीए. याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी घेतली असून या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यास सांगितलं आहे.

कंगनाचा पाठिंबा
पायलनं अनुरागवर आरोप केल्यानंतर कंगनानं पायलच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक आवाज महत्त्वाचा असं म्हणत तिनं अनुराग कश्यप याला अटक करण्याची मागणी केली आहे.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close