देश विदेश

‘मृत्यूदराचे जिल्हानिहाय आणि रुग्णालय निहाय मूल्यमापन करा’

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

केंद्राकडून सर्वाधिक कोरोनाप्रभावित राज्यात सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन अभावी कुठल्या रुग्णाचा मृत्यू होवू नये, यासाठी वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात येणाऱ्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंबंधीची माहिती या उच्चस्तरीय बैठकीतून घेण्यात आली.

आरटी-पीसीआर चाचण्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहनही राज्यांना यावेळी करण्यात आले. जिल्हा तसेच आरोग्य केंद्रांच्या पातळीवरील ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे मूल्यमापन करावे, प्रभावी नियोजन आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसंदर्भातील मुद्यांचे निरसन करण्यावर विशेष लक्ष देण्याची सूचना सर्व राज्यांना देण्यात आली आहे. रोग नियंत्रणासाठी करत असलेल्या प्रभावी उपाययोजनांच्या माहितीची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

वाचा : आता कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकता येणार; मोदी सरकारकडून विधेयक सादर!

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या उच्च स्तरीय बैठकीत नीती आयोग सदस्य( आरोग्य), केंद्रीय आरोग्य सचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, चंदीगड, तेलंगणा, केरळ, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम बंगाल या १२ राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. देशातील एकूण कोविड रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णसंख्या या राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली असली, तरी बऱ्याच राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त मृत्यूदर असल्याबद्दल बैठकीतून चिंता व्यक्त करण्यात आली.

वाचा :  अखेर कृषी विधेयकं राज्यसभेतही मंजूर

मृत्यूदराचे जिल्हानिहाय आणि रुग्णालय निहाय मूल्यमापन करण्याचे आणि त्यानुसार जास्त लक्ष देण्याचे आवाहन केंद्राकडून करण्यात आले. रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये निगेटिव्ह असलेला मात्र लक्षणे असलेला कोणताही रुग्ण उपचारांमधून वगळला जाऊ नये याची खातरजमा करण्याची गरज बैठकीतून अधोरेखित करण्यात आली. अशा सर्व रुग्णांची तपासणी आरटी-पीसीआर चाचणीने प्राधान्याने केलीज पाहिजे, असे केंद्राकडून सांगण्यात आले.

वाचा : पूर्व लडाखमधील ‘एलएसी’ जवळील सहा टेकड्या लष्कराच्या ताब्यात 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close