पश्चिम महाराष्ट्र

ST Bus service: एसटी महामंडळाला ३३०० कोटींचा फटका – 3300 crore hit to st corporation

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) मार्च ते ऑगस्ट या कालावधीत सुमारे ३३६६ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, त्या पार्श्वभूमीवर इंटककडून राज्यव्यापी अभियान राबवले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन, ‘एसटी बचाव-कामगार बचाव’ असे साकडे घातले जाणार आहे.

करोना साथीमुळे राज्य सरकारने २३ मार्चपासून एसटीची बस सेवा बंद केली होती. त्यांनतर २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू केली, तर १८ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. दररोज २२ कोटी रुपये या प्रमाणे १५३ दिवसांच्या लॉडाउनमुळे ३३६६ कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळास अर्थसाह्य देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावे, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २४ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने एसटी बचाव-कामगार बचाव अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

‘दोन महिन्यांचे वेतन नाही’

एसटी कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. या दोन महिन्यांचे वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी इंटकने केली आहे. एसटी महामंडळास आर्थिक नुकसान भरपाईपोटी ३००० कोटी रुपये अनुदान द्यावे, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमणे वेतन द्यावे, शासन निर्णयाप्रमाणे लॉकडाउन काळात एसटी कर्मचाऱ्यांना हजेरी द्यावी, प्रस्तावित स्वेच्छा निवृत्ती योजनेत प्रतिवर्ष ८ महिन्याचे वेतन द्यावे, प्रवासी कर १७.५ टक्क्यांऐवजी ७ टक्के आकारावा आदी मागण्या इंटकने केल्या आहेत.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close