देश विदेश

तब्बल ३२ हजार २३८ निमलष्करी सैनिक कोरोनाबाधित!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

निमलष्करी सेवेत कार्यरत असलेल्या 32 हजार 238 जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून रविवारी लोकसभेत देण्यात आली. जे सैनिक कोरोनाबाधित झाले आहेत, त्यात सीआरपीएफचे 9 हजार 158 सैनिक असून बीएसएफचे 8 हजार 934, सीआयएसएफचे 5 हजार 544, आयटीबीटीचे 3380, एसएसबीचे (सशस्त्र सीमा बल) 3251, आसाम रायफल्सचे 1746 तर एनएसजीच्या 225 जवानांचा समावेश असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. 

वाचा :आता कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकता येणार; मोदी सरकारकडून विधेयक सादर!

कोरोना रिकव्हरी दराचा विचार केला तर सीआरपीएफमधीक सैनिकांचा रिकव्हरी दर 84.4 टक्के इतका असून बीएसएफमधील रिकव्हरी दर 80.41 टक्के, सीआयएसएफमधील सैनिकांचा रिकव्हरी दर 75.25 टक्के इतका आहे. मृत्यूदराचा विचार केला तर सीआयएसएफमधील सैनिकांचा मृत्यूदर सर्वाधिक 0.43 टक्के इतका आहे. त्याखालोखाल आसाम रायफलमधील मृत्यूदर 0.40 टक्के इतका असून सीआरपीएफमधील मृत्यूदर 0.39 टक्के इतका आहे.

वाचा : अखेर कृषी विधेयकं राज्यसभेतही मंजूर

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close