मनोरंजन

meer foundation: शाहरुखच्या फउंडेशननं व्हायरल व्हिडिओतल्या ‘त्या’ चिमुकल्याला घेतलं दत्तक – shahrukh khan’s meer foundation will support the boy whose trying to wake his dead mother

मुंबई: श्रमिकांचा मूळ गावाकडं होणारा प्रवास कसा जीवघेणा आहे, याचे अंगावर काटा आणणारे दृश्य दिसून येत आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, अशी विदारक स्थिती या निमित्तानं पुन्हा सामोरी आली होती.या रेल्वेस्थानकावर ब्लॅँकेटनं एका महिलेचा झाकून ठेवलेला मृतदेह आणि तिला उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहानग्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याच्या मीर फाउंडेशननं या मुलाला दत्तक घेतल्याची माहिती आहे.

मीर फाउंडेशन च्या ट्टिवटर अकाऊंटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘ व्हिडिओमध्ये आईला उठवणाऱ्या या चिमुकल्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत केल्याबद्द आभार, आम्ही त्याची जबाबदारी घेतोय, तो सध्या त्याच्या आजी-आजोबांजवळ सुरुक्षित आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मीर फाउंडेशन आणि शाहरुखचे चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

लॉकडाउन श्रमिकांच्या जीवावर उठल्याचं दाखविणाऱ्या या प्रकारावरून राजकारणही सुरू झालं आहे. चिमुकल्याच्या आईचा मृत्यू अन्नपाणी न मिळाल्यानं झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे तर, ती आजारी होती, प्रवासातच तिचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात दिल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
टीव्ही अभिनेत्री मोहेना कुमारी सिंह हिला करोनाची लागण
मृतदेहावर घातलेले ब्लँकेट सातत्यानं ओढणारा लहानगा आणि आजूबाजूला कुणीच नाही. फक्त रेल्वेच्या आगमन-निर्गमनाच्या घोषणा तेवढ्या होत आहेत, श्रमिकांची गावाकडं परतण्याची झुंबड उडाली आहे, असें विदारक दृश्य, राष्ट्रीय जनता दलाचे नेते संजय यादव यांनी ट्विट केलं होंतं. त्यांनी याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाला जाबही विचारला होता.

हुड दबंग…दबंग गातानाचा वाजिद यांचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ व्हायरल

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close