मनोरंजन

'हिंदुस्तानी भाऊ'चा धमाका; एकता कपूरविरोधात एफआयआर दाखल

मुंबई: बीग बॉस फेम म्हणजेच ‘हिंदुस्तानी भाऊ’ यानं हिंदी टेलीव्हीजन क्षेत्रातील प्रसिद्ध निर्मात्या एकचा आणि शोभा कपूर यांच्याविरोधत एफआयआर दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. काल त्यानं एक पोस्ट शेअर करत ‘उद्या मोठा धमाका होणार आहे’ असं म्हटलं होतं.

पोस्ट शेअर करताना त्यानं मोठ्या व्यक्तीचा पर्दा फाश करणार असल्याचं म्हटलं होतं. पण ही व्यक्ती नेमकी कोण हे त्यानं लिहिलं नव्हतं. त्यामुळं त्याच्या या पोस्ट संदर्भात चर्चा सुरू होती. अखेर आज त्यानं खार पोलिस स्थानकात निर्मित्या एकता आणि शोभा कपूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

एकता आणि शोभा कपूर यांच्या निर्मिती असलेल्या एका वेबसीरिजमध्ये सैनिकाचा अपमान करण्यात आला असल्याचं या एफआयआरमध्ये म्हटलं गेलं आहे. या वादग्रस्त वेबसीरिजमध्ये एका जवानाची पत्नी तो ड्युटीवर जॉईन झाल्यानंतर प्रियकराला घरी बोलावते असं दाखण्याता आल्याचा दावा हिंदुस्तानी भाऊनं केला आहे. यामुळं भारतीय सैन्यातील जवानांचा अपमान झाल्याचं हिंदुस्तानी भाऊनं म्हटलं आहे.

?
पुलवामा हल्ल्यानंतर भारताविरोधात बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी विकासनं एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यानं ‘हिंदुस्थानी भाऊ’या नावानं व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तसंच ‘बिग बॉस’ हिंदीच्या तेराव्या पर्वात तो सहभागी झाला होता. विकासनं वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून ३५ व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला होता.

वाचा:

बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात तो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विकासने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला आहे. ‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत विकानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विकास ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावानंच टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ त्याच्या शैलीत फिरकी घेत असतो. भाऊचे यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे टिकटॉकवर १५ लाख फॉलोअर्स होते पण कॅरी मिनाटीला सपोर्ट करण्यासाठी त्यानं ते डिलीट केलं.अगदी लहान वयात विकासनं घराची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली होती. त्यामुळं त्याचं शिक्षण केवळ सातवी इयत्तेपर्यतं होऊ शकलं. सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात २०रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी त्याने धरली होती. त्यानंतर त्यानं बारमध्ये वेटर म्हणून काम केलं होतं. मराठमोळा विकास जयराम पाठक हा जन्मानं मुंबईकर असून. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा यांच्यासह मुंबईत राहतो.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close