मनोरंजन

happy birthday r. madhavan: बर्थडे स्पेशल: आर.माधवनचं कोल्हापूर कनेक्शन माहित्येका?

मुंबई: ‘रेहना है तेरे दिल में’ असं म्हणत अभिनेता आर. माधवन आजही अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. ५० वा वाढदिवस सेलिब्रेट करत असला तरी त्याची क्रेझ आजही तितकीच कायम आहे. माधवनचा जन्म हा बिहारमधील जमशेदपूरमध्ये झाला असला तरी त्याचं शिक्षण महाराष्ट्रात झालं आहे. कोल्हापूरशी त्याचं विशेष नातं आहे.कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्यानें शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केलं होतं. इतकंच नाही तर त्याची पत्नी सरिता हिची भेटही कोल्हापूरात झाली होती.

माधवन अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आणि सरिताच्या पहिल्या भेटीबद्दल आवर्जून सांगतो. त्यानं ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ची एक भन्नाट आठवनही एका मुलाखतीत सांगितली होती. ‘माझी आणि सरिताची भेट कोल्हापूरमध्ये झाली. तिथं आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण लग्नाच्या गाठीत बांधलो गेलो नसतानाची ही गोष्ट आहे. त्यावेळी व्हॅलेण्टाइन डे वगैरे कोणाला फारसा ठाऊक नव्हता आणि कोल्हापूरमध्ये तर नाहीच नाही. तरीही सरिताला घेऊन मी एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो. गुडघ्यावर बसून, हार्टच्या आकाराची लाल रंगाची छोटीशी उशी तिला दिली आणि म्हटलं ‘बी माय व्हॅलेण्टाइन’. आजुबाजूच्या कोल्हापूरकर मंडळींना कळेच ना की हा काय फिल्मीपणा सुरू आहे ते. पण तरीही सगळ्यांची मस्तपैकी करमणूक झाली. ती पहिल्यांदा थोडी ओशाळली. पण मग मस्तपैकी लाजली. आजही तो दिवस मला लख्ख आठवतो’; अशी आठवण माधवन सांगतो.सरिताबद्दल बोलताना तो थांबत नाही. तिच्यावर असलेलं प्रेम वेळो वेळी व्यक्त करत असतो.


कोल्हापूरबद्दल बोलताना माधवन थकत नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना कोल्हापूरमध्ये मी मोठ्या प्रमाणात कष्ट केलं. त्यामुळंच भविष्यात मला यश मिळालं कोल्हापूरसारखी उर्जा इतर कोणत्याही शहरात नाही. त्यामुळं येथील लोकांनी जगभर नाव केलं आहे. येथ समाजसेवेचा, मदतीचा वारसा आहे’; असं माधवन म्हणतो.

आर. माधवनची सिनेसृष्टीच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून झाली होती. बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्यानं बॉलिवूडमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘रेहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आहे. माधवनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो ‘रॉकेट्री‘ या चित्रपटामध्ये तो नाम्बी नारायण यांची भूमिका साकारतोय.

अभिनेता सोनू सूद यानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

आयुष्यमान खुरानाच्या ५ चित्रपटांचे होणार साउथमध्ये रिमेक

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close