देश विदेश

कसाब, अफजल, याकुबच्या फाशीवर प्रणव मुखर्जींचीच मोहर!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

प्रणव मुखर्जींना विद्वत्ता तसेच शालीन व्यक्तिमत्वामुळे आठवणीत ठेवण्यात येईल. पंरतू, वेळप्रसंगी त्यांनी  कठोर निर्णय देखील घेतले.शिक्षा ठोठवण्यात आलेल्या कैद्यांच्या अर्जावर त्यांनी कठोरतेने निर्णय घेतले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास ९७ टक्के दयेचे अर्ज फेटाळले. मुखर्जी यांच्या पूर्वी आर.वेंकटरण यांच्याकडून सर्वाधिक दयेचे अर्ज फेटाळण्यात आले होते. आर.वेंकटरमण १९८७  ते १९९२ पर्यंत राष्ट्रपती होते. यादरम्यान त्यांनी एकूण ४४ दयेचे अर्ज फेटाळले.तर, मुखर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात ३७ याचिकाकर्त्यांशी संबंधित २८ दयेचे अर्ज फेटाळले. प्रणव मुखर्जींच्या पूर्वी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सर्वाधिक ३० याचिकाकर्त्यांना ​फासी पासून वाचवले होते. मुखर्जींनी केवळ ७ फाशीच्या शिक्षा माफ केल्या होत्या. मुखर्जी राष्ट्रपती असतांनाच तीन दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा मिळाली. यात संसदेवर हल्ला करणारा आरोपी अफजल गुरु, मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब तसेच मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेनन यांचा समावेश आहे. 

अजमल कसाब

२९ ऑगस्ट २०१२ ला सर्वोच्च न्यायालयाने कसाबला भारताविरोधात युद्ध पुकारल्याच्या दोषाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेविरोधात कसाबने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज सादर केला होता. ५ नोव्हेंबर २०१२ ला कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१२ ला मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबला फाशी देण्यात आली.

अफजल गुरु

संसदेवर हल्ला चढवल्या प्रकरणी ४ ऑगस्ट २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरु ला फाशीची शिक्षा सुनावली.यानंतर अफजल ची पत्नी तब्बसुम गुरु यांनी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे दयेचा ​अर्ज केला. एपीजे अब्दुल कलाम २००२ ते २००७ पर्यंत राष्ट्रपती होते. २०१२ ते २०१७ दरम्यान मुखर्जी देशाचे राष्ट्रपती होते. ३ फेब्रुवारी २०१३ ला मुखर्जींनी अफजलचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ ला अफजल गुरुला तिहाड कारागृहात फाशी देण्यात आली. 

याकूब मेमन

मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडूवन आणारा याकूब मेनन ला २००७ मध्ये टाडा न्यायालयाने दोषी ठरवले. मार्च २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमन ची शिक्षा कायम ठेवली.२९ जुलै २०१५ ला मेमन चा १४ पानी दयेचा अर्ज मुखर्जी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. पंरतू, त्याच दिवशी मुखर्जींनी हा दयेचा अर्ज फेटाळला. ३० जुलै २०१५ ला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मेमन ला फाशी देण्यात आली. 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close