मनोरंजन

धारावीतील नागरिकांच्या मदतीसाठी धावला बॉलीवूडचा सिंघम


जगावर ओढावलेल्या आणि महामारीपेक्षा भयानक असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच या व्हायरसला रोखणारी लस अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे पूर्ण जग ठप्प पडले आहे. त्याला आपला देश देखील अपवाद नाही. त्यातच आता या व्हायरसच्या विरोधातील लढाईत सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी कंबर कसली आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातही सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्या मुंबईत दर दिवशी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील धारावी येथील मोठी दाटीवाटीची वस्ती कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. परिणामी या भागात लॉकडाऊनचे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

धारावीतील अनेक सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनावर आलेल्या निर्बंधांमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच परिस्थितीचा आढावा घेत धारावीमधील नागरिकांच्या मदतीसाठी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगन पुढे सरसावला आहे. त्याचबरोबर त्याने इतरही कलाकारांना धारावीतील कुटुंबासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अजयने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत लिहिले आहे, कोरोनाच्या महामारीचे धारावी हे मुख्य केंद्र झाले आहे. एमसीजीएमच्या पाठिंब्याने अनेक मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था येथे काम करत आहेत. गरजवंतांना रेशन आणि हायजिन किट उपलब्ध करुन देत आहेत. एडीएफएफच्या माध्यमातून आम्ही देखील ७०० कुटुंबांना मदत करत आहोत. या मंडळींची मदत करण्याचे मी तुम्हालाही आवाहन करतो.

एकीकडे अभिनेता सोनू सूद हा स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. दुसरीकडे श्रमिकांच्या जेवणाची बिग बी अमिताभ बच्चन व्यवस्था करत आहेत तर, आता अजय देवगनही आपल्यापरीने मुंबईतील धारावीत असणाऱ्या कुटुंबांचा आधार झाला आहे. कलाविश्वातील या आणि अशा कित्येक सेलिब्रिटींनी या संकटाच्या प्रसंगी सढळ हस्ते मदत करत समाजाप्रतीची आपली जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली आहे.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close