देश विदेश

भाजपला फुटला घाम! राजस्थानात सतावतेय आमदार फुटण्याची भिती

जयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमध्ये आता काँग्रेसपाठोपाठ भाजपलाही फुटीच्या राजकारणाची भीती वाटू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने १२ आमदारांपाठोपाठ शनिवारी आणखी सहा आमदारांना गुजरातमध्ये हलविले असून, राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंर्षाला यामुळे नवे वळण मिळाले आहे.   

राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमिवर भाजपने शुक्रवारी जालोर, सिरोही, उदयपूरमधील १२ आमदारांना अहमदाबाद शहरातील एका रिसॉर्टवर पाठविले. यानंतर शनिवारी आणखी सहा आमदारांना खासगी विमानाने पोरबंदर येथे हलविण्यात आले असून, यात निर्मल कुमावत, गोपीचंद मीणा, जब्बरसिंह सांखला, धर्मवीर मोची, गोपाल लालशर्मा आणि गुरुदीप सिंह शाहपिनी यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरीत आमदारांना जयपूरमध्येच सुरक्षित ठेवण्याची पक्षाची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी आमदारांना हलविण्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, सर्व आमदार पक्षाच्या पाठिशी असून, संशयाला कुठेही वाव नाही. उलट काँग्रेस सरकारमधील काहीजण सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे अफवा पसरवून भाजप नेत्यांविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. लवकरच पक्षाची बैठक घेण्यात येणार असून, सर्व आमदार त्यात उपस्थित असतील, अशी माहितीही पुनिया यांनी दिली. 

पोलिसांकडून आमदारांना त्रास : लाहोटी

भाजप आमदार अशोक लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सहा आमदार पोरबंदरकडे रवाना झाले. तत्पूर्वी जयपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना लाहोटी यांनी पोलिस, प्रशासनाकडून भाजप आमदारांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. हे आमदार स्वच्छेने देवदर्शनासाठी निघाल्याची सारवासरवही त्यांनी या वेळी केली. अधिवेशन सुरु होईपर्यंत त्यांचा मुक्काम गुजरातमध्येच राहणार असल्याचे समजते.

प्रशिक्षणाच्या नावाखाली उर्वरित आमदारांनाही एकत्र आणणार

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या उर्वरीत आमदारांनाही  घोडेबाजारापासून दूर ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना जयपूरमध्ये एकत्र आणले जाणार असून, गुजरातला गेलेले आमदारही या वेळी परततील, असे सुत्रांनी सांगितले.  

 

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close