आरोग्यउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईराज्यलैंगिक शिक्षणविदर्भशिक्षण

लैंगिकतेवर बोलू काही… भाग १४ – लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी

Spread the love

डॉ. राहुल पाटील –  लैंगिक शिक्षण देताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. लैगिक शिक्षण देणाऱ्या पालकांनी, शिक्षकांनी मुलामुलींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लिंगविषयक बोलीभाषेतील शब्द वापरू नयेत.
स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयी चर्चा करू नये.
अवास्तव माहिती सांगू नये. कामुक चित्र, कामुक भाषा, कामुक हालचाली करू नये.
साधारण लैंगिकता शिक्षण अर्धा ते पाऊण तास द्यावे.
पुढील माहिती सांगत असताना आतापर्यंतची माहिती समजली का ? याविषयी विचारणा करावी. बऱ्याचवेळा तीच तीच माहिती पुन्हा सांगावी लागते.
कोणताही प्रश्न विचारल्यावर त्यावर हसू नये. माहीत नसल्यास त्याची प्रथम माहिती करून घ्यावी.
आक्षेप –
असे शिक्षण दिल्याने मुलं-मुली ते सुख घेण्याची शक्यता आहे. असा पहिला आक्षेप असतो पण प्रत्यक्षात वयात आलेली मुले हे स्वतःच्या लिंगाच्या आकाराविषयी चिंतेत असतात. वीर्यपतन, लिंग ताठरता हे तपासण्यासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांकडे संभोग अनुभवायला जातात. अर्थातच, लिंगाचा आकार, वीर्यपतन, लिंग ताठरता याविषयी शास्त्रीय माहिती लैंगिकता शिक्षणात दिली जाते. म्हणजे ही माहिती प्राप्त झाल्यावर ‘मुले’ ही तपासणी करण्यासाठी वेश्यागमन करतील का ? तर नाही.
दुसरा आक्षेप असतो, लैंगिक छळाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणे योग्य आहे का ? यावर उत्तर असे की, लैंगिक छळ का कोणत्याही वयोगटात कोणत्याही व्यक्तीकडून होऊ शकतो. छळ करणारा बऱ्याचवेळा पीडितांच्या ओळखीचा असतो. शरीराचा भाग उघडा वा झाकलेला असो, लैंगिक छळ कधीही होऊ शकतो. लैंगिकता शिक्षणात लैंगिक छळापासून बचाव करण्यासाठी काही ‘नाट्य रूपांतर’ करून दाखविले तर मुलं-मुली सतर्क राहतील व लैंगिक अत्याचार घडणार नाही. फक्त मुलींसोबतच नव्हे तर मुलांसोबतही लैंगिक छळ होतो, हे ध्यानात घ्यावे.
यावर तिसरा आक्षेप घेतला जातो तो हा की, मुलामुलींना हे शिक्षण एकत्र द्यावे का ? यावर एकत्र शिक्षण दिल्यावर काही तोटा होतो असे नाही. हे नक्की की, मुलांना त्यांच्या शरीराबरोबर मुलींच्या शरीराविषयी माहिती असावीच. तसेच मुलींना मुलांच्या शरीराविषयी माहिती असावी. लग्न ठरविताना मुलींना पुरुष लिंगाच्या वेगळेपणाबद्दल, त्याच्या जन्मजात विकृतीबद्दल तज्ञांकडून माहिती द्यावी लागते. कारण पुरुषांमध्ये लिंग विकृती असताना त्यांनी फसवून मुलींशी लग्न केलेल्या केसेस मी पाहिल्या आहेत.
लैंगिकता शिक्षणाने कोणताही तोटा होणार नाही तर मानवी लैंगिकता समजल्याने निकोप लैंगिकता तरुण-तरुणींच्यात निर्माण होण्यास हातभारच लागणार आहे. तेव्हा याला नाहक विरोध करण्यापेक्षा योग्य तो बदल करून घेतला तर ते उपयोगीच आहे.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
भाग- १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग- २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
पुरुषांच्या समस्या भाग १० – कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.  नवीन अपडेट मिळवण्यासाठी subscribe करा.
– डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर ( मोबाईल- ९८२२५३४७५४ )

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: