आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामुंबईराज्यलैंगिक शिक्षणविदर्भशिक्षण

लैंगिकतेवर बोलू काही… भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या

Spread the love

लैंगिकतेवर बोलू काही… भाग – ५

राहूल पाटील – भावी पती पत्नीच्या काही तपासण्या विवाहपूर्व करुन घेणे फायद्याचे ठरते. रक्तगट, एचआयव्ही, गुप्तरोग, मानसिक आजार यांची तपासणी होणे आवश्यक असते. बऱ्याचवेळा फक्त शारिरिक आजारांकडे लक्ष दिले जाते. परंतु, मानसिक आजारांकडे लक्ष दिले जात नाही. परंतु मानसिक समस्या हे सामान्य लोकांना लक्षात येत नाही. संशयी स्वभाव, तापट स्वभाव, निर्णय घेण्यास अवघड जाणे ह्या खऱ्यातर समस्या आहेत. व्यक्तिमत्वातील दोष आहेत. याचा वाईट परिणाम वैवाहिक आयुष्यावर होतो.
पुरुषांमध्ये वीर्य तपासणी, जननइंद्रीय त्याची रचना, कार्य व्यवस्थित आहे का ? हे तपासणी आवश्यक आहे. तसेच काही लैंगिक समस्या, समलिंगी आकर्षण, व्यसनाधिनता आहे का ? हे पहावे तपासून पहावे.
स्त्रीमध्ये बीजांड तयार होते का ? गर्भाशय, आई होण्यास योग्य आहे का ? दोघांमध्ये कोणते अनुवांशिक आजार आहेत का ? हे पहावे.
खरेतर या तपासण्या केल्यावर खूप फायदे होतात. कारण, काही समस्या लपवून ठेवल्याने पुढील लोकांची फसवणूक झालेल्या केसेस पहायला मिळतात. समस्या निर्माण होण्यापेक्षा खबरदारी घेतलेली कधीही बरी असते.
आपले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
भाग- १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग- २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2

भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty

भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
डॉ. राहुल पाटील, (लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर. मोबाईल- ९८२२५३४७५४ )
पुढील भागात आपण पाहणार आहोत –  कामजीवन आणि स्त्रीया

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: