राज्यवर्धाविदर्भ

कामगाराचे शव थेट कंपनीच्या गेटसमोर; मोबदला देण्याची नातेवाईकांची मागणी

Spread the love

निलेश पिंजरकर, (वर्धा) – भुगाव येथे असलेल्या उत्तम व्हॅल्यू स्टील कंपनीत 27 मे ला कामगार सुनील कोमलसिंग यादव वय 25 वर्ष सकाळी काम करीत असताना वरुण खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या कामगारांच्या कुटुंबीयांना मोबदला द्या या मागणी साठी त्याचे शव कंपनी गेट सोमोर आणल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली सेवाग्राम रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर मृतकाचे शव कंपनी गेट सोमोर ठेवण्यात आले परंतु कंपनी चे अधिकारी काही बोलण्यास तयार नसल्याने वातावरण तापले तरीही कंपनी चे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातच चर्चा चालू होती .
मिळालेल्या माहिती नुसार या कंपनीत कामगारांचे शोषण केल्या जाते बारा तास काम करुनही कामगारांना दोनशे ते अडीचशे किमान वेतन कायद्याचे उल्लंघन केल्या जाते कामगारांचा पी एफ सुद्धा कापला जात नाही अशी माहिती सोमोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे .
कंपनीचे अधिकारी मग्रूर
या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच 28 तारखेला कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी कंपनीत गेले असता या अपघाताची माहिती देण्यास कार्यरत अधिकारी माहिती देण्यास पुढे आले नाहीत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: