उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामुंबईराज्यविदर्भ

निपाह विषाणूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

Spread the love

पंकज खुसपे, (नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) – निपाह विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्मदर्शी सजीव असून तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. निपाह हा याच विषाणू प्रवर्गातील एक आहे. निपाह विषाणू हा एक प्रकारचा संक्रमीत आजार आहे. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. त्या गावाच्या नावावरुन त्याचे नाव निपाह ठेवण्यात आले. जो प्राणी, पशू-पक्षांनी झाडावर खाल्लेली फळे, फळे यांच्यात आणि त्यानंतर माणसांत संक्रमीत होतो. निपाह हा घातक विषाणू डुक्कर व वटवाघुळ यांच्या लाळेपासून तयार होतो. डुक्कर पालन करणाऱ्या मलेशियातील शेतकऱ्यांत जगात सर्वप्रथम हा विषाणू दिसून आला. त्या नंतर बांगलादेशात ही या विषाणूचे रुग्ण आढळुन आले होते. वटवाघळांच्या लाळेमध्ये हा विषाणू आढळतो. विषाणूंच्या संसर्गाने व्यक्तीला मेंदुज्वर होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. डुक्कर किंवा वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे खाल्ल्याने हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. निपाह या विषाणूवर आतापर्यंत कोणतीही लस अथवा ठोस औषध बाजारात उपलब्ध नाही. परंतु, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या लक्षण अनरूप औषधोपचार दिला जातो.
निपाहची लक्षणे
• ताप
• डोकेदुखी
• अंगदुखी
• मळमळ व उलट्या
• मान दुखणे
• मानसिक गोंधळ
• जास्त झोप येणे
• आळस येणे
• निपाह व्हायरसग्रस्त लोकांना श्वसनास त्रास होतो.
• श्वास घेताना जळजळल्यासारखेही वाटते.
यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ञाला भेटा व त्याच्या सल्याने उपचार घ्या. संसर्ग झाल्या पासुन किमान ४८ तासांत योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यास व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.
काय काळजी घ्याल
• खास करून खजूर न खाणे
• पक्षांनी खाल्लेली फळे न खाणे
• कच्ची फळे, झाडावरील अर्धवट खाल्लेली फळे टाळा
• डुकरांपासून दूर राहणे
• डुक्कर आणि डुक्कर हाताळणी करणाऱ्यांपासून संपर्क टाळा
• निपाहची लागण झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येणे
• हात नियमित स्वच्छ धुवून आरोग्य नीट ठेवावे
• भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून घ्या
• सुरक्षिततेसाठी (एन95) मास्क वापरा
या विषाणूमुळे जरी खुप मृत्यू झाले असले तरी, घाबरुन न जाता योग्यती काळजी घ्या आणि स्वतःचे आणि आपल्या घरच्यांचे संरक्षण तसेच  काळजी घ्या.
 

Tags

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: