परभणीमराठवाडाराज्य

"जगात जर्मनी अन् भारतात परभणी" असे म्हणत परभणी महापालिका भारतात पहिल्या क्रमांकावर

Spread the love

महाराष्ट्र विश्‍व न्यूज (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत अभियान २०१८ अंतर्गत नागरिकांच्या स्वच्छते संदर्भातील तक्रारी सर्वात जलद गतीने सोडविल्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेने भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

manpa photo
महानगरपालिकेत आनंदोत्सव साजरा करताना कर्मचारी

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत झालेल्या स्वच्छता अभियानात परभणी शहर महानगरपालिकेने सहभाग घेतला होता. त्यानंतर महापालिकेने शहरात स्वच्छतेची विविध कामे मोठ्या प्रमाणात केली. तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून आपल्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांना चांगला प्रतिसाद देवून आपल्या तक्रारी नोंदवल्या. या तक्रारी मनपाने १२ ते २४ तासात सोडविल्या. यामुळे परभणी शहराला नागरिकांच्या तक्रारी त्वरीत सोडविल्याबद्दल भारतात ३ लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या यशाचे श्रेय परभणी शहरातील तत्कालीन आयुक्त तथा धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापौर सौ. मिनाताई वरपूडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे, उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी, चंद्रकांत शिंदे, सौ. मंगला मुदगलकर, मनपाचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्याने हे यश संपादन करण्यात आले. यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कामगार, मलेरिया विभागाचे कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांनीही यात मोलाचा वाटा उचलला. तसेच शहरातील सेवाभावी संस्था, डॉक्टर, वकील, जलमित्र संघटना, लॉयन्स क्लब, व्यापारी, व शहरातील सर्व नागरिकांनी यात सहभाग घेतला. त्यामुळे भारतात परभणी शहराचे नाव लौकिक झाले आहे.

या यशाबद्दल मा. जिल्हाधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच आज महापालिकेच्या वतीने सर्व अधिकारी, कर्मचारी, संघटना यांनी या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच यावेळी विशेष सत्कारही करण्यात आले. मा. उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त जी.एम. जाधव, नगररचनाकार शिवाजी जाधव, अंतर्गत लेखापाल प्रमुख राठोड, सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, अल्पेश देशमुख, किंगरे, मलेरिया अधिकारी विनय मोहरीर, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड आदींच्या हस्ते स्वच्छता कामगार, सफाई कामगार, मलेरिया विभाग कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष बाब म्हणून स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विकास रत्नपारखे, मेहराज अहेमद, नायरत्न घुगे, श्रीकांत कुर्रा, शेख शादाब, राजू झोडपे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छता अभियानासाठी डॉकुमेंटरी, पथनाट्य आदी करण्यासाठी म्हणून विद्युत अभियंता मिर्झा बेग, प्रकल्प अधिकारी मस्के, अरशद बेग, इंजि. धोत्रे, युनियन नेते के. के. भासाकळे, प्रिया जोशी, मोहम्मद अथर आदींचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

6 Comments

 1. अगदी उत्कृष्ट कार्य केलेमनपाअधिकारी,पदाधिकारीयांंचे या कार्यात शहरातुन लोक सहभाग मोठ्या प्रमाणात होता.स्वच्छ परभणी अभियान अंतर्गत स्वच्छता दूत डॉ.राजगोपाल कालानी सर स्वच्छता अग्रदूत डॉ. सुहास विभुते,धनंजय जोशी,रितेश जैन यांनी परभणी स्वच्छकरण्यात सिंहाचा वाटा होता.याची दखल घेणे गरजेचे आहे.

 2. पारितोषिक घेण्या पुरतेच स्वछता अभियान राबविले आहे अस दिसतेय कारण आज पूर्वी सारखीच “बकाल” अवस्था आणि अस्वछता जागोजागी दिसत आहे.

 3. “परभणी ” ‘कर’
  परभणी कर तू फक्त करच भर,
  आणि पाऊस आला तर,
  खड्ड्यात पाणी भर,
  गाडी चालवून मणक्याचे हाल कर,
  करा वर कर स्थानिक कर,
  होत नाही विकास तरी पण भर;
  इथे कर भरुनही नाही विकासाची सर; राजकारनाच्या चक्कीत तू मात्र मर;
  नाली स्वच्छ नाही, कचर्‍याचा थर,
  रस्त्यावर खड्डे पण रोड टॅक्स भर,
  नळाला पाणी

Leave a Reply

Close
%d bloggers like this: