मुंबईमुंबईराज्य

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

Spread the love

राम खुर्द्ळ, (मुंबई) – राज्याचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. स्‍वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेऊन रॉय यांनी आत्‍महत्या केली. गेल्या काही काळापासून दुर्धर आजाराने ग्रासल्याने ते रजेवर होते. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्‍महत्या केल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे.
हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मध्ये झालेल्या आयपीएलच्या स्‍पॉट फिक्‍सिंग प्रकरणात त्यांनी बिंदू दारासिंहला अटक केली होती. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याचा ड्रायव्‍हर आरिफ बाईल याच्यावर झालेले गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान हत्या प्रकरण अशी महत्त्‍वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात रॉय यांची महत्त्‍वाची भूमिका होती.
रॉय यांच्या अचानक आत्‍महत्येच्या प्रकरणामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. अद्याप आत्‍महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: