उत्तर महाराष्ट्रजळगावराज्य

बोहरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीकडून जळगाव पोलीस अधिक्षकांना निवेदन

Spread the love

शिवाजी पारधी, (अमळनेर) – शहरात दि.०३ मे रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास शहराच्या उच्चभ्रू  मध्यवस्तीत पेट्रोल पंपाचे मालक बाबा अली असगर बोहरी यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.
या खुनामुळे अमळनेर शहरातील व्यावसायिक व सर्व सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच दोन महिन्या पूर्वी प्रा.दीपक डी.पाटील यांचा देखील निर्घृण खून करण्यात आला. त्या खुनातील आरोपी आजपर्यंत हे मोकाट असून जेरबंद झाले नाहीत. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर शहरवासियांमध्ये  आणि तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवेदना द्वारे अशी मागणी करण्यात आली की, या दोन्ही खुनांतील घटनांचा तपास एल. सी. बी तत्काळ आजच वर्ग करण्यात यावी.  अमळनेर शहर व तालुक्यामधील अवैद व्यवसाय दारू, जुगार, मटका हे मोठया प्रमाणावर फोफावले आहेत. या अवैद व्यवसायामुळे संघटीत गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढत चाललेली आहे. अवैध व्यवसाय त्वरित पूर्णपणे बंद करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष्यातर्फे तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील,  तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील,  कार्याध्यक्ष प्रा. सुरेश विक्रम पाटील,  शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,  युवक शहराध्यक्ष विश्वास पाटील,  डाॅ. हेमंत कदम,  सुनिल शिंपी,  उमेश सोनार , दर्पण वाघ,  निलेश देशमुख, प्रविण पाटील,  कल्पेश गुजराथी यांनी यावेळी निवेदनावर स्वक्षऱ्या केल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: