मराठवाडाराज्यहिंगोली

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Spread the love

बाळू जाधव, (हिंगोली) –  दि.०२ मे २०१८ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन मा. दिवाकर माने ( रिपाई (ए ) मराठवाडा प्रदेश सचिव ) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनाच्या मुख्य उद्देश हे एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये या प्रमुख मागण्या आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी, भीमा कोरेगांव हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार पुजा सुरेश सकट हिच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे, भिमा कोरेगांव प्रकरणी बंद मधील आंदोलनाकर्त्यांवरिल खटले काढून घेण्यात यावेत, अट्रॉसिटी कायद्याला धक्का लागता कामा नये, अट्रॉसिटी कायदयात कोणत्याही प्रकारचा बदल न करता या कायदाचे संपूर्ण संरक्षण झाले पाहिजे, अनुसूचित जाती जमाती, ओ.बी.सी. व भटक्या जमातीच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, जम्मू काश्मीर मधील कठुआ व उत्तरप्रदेश मधील उण्णाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हिंगोली जिल्हयातील शहरी व ग्रामिण भागात केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या घरकुल योजनेसाठी अतिक्रमण जागेवर राहत असलेल्या लोकांना ग्रामपंचायतने नमुना नं ८ व शहरी भागात नगर पालिकेने रिव्हिजन रजिस्टर नोंद घेऊन मालकी हक्काचे पुरावे देण्यात यावेत,तसेच कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयास डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय असे नाव देण्यात यावे. अशा विविध मागण्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी साहेबाना देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रिपाई चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
रिपाई (ए) मराठवाडा प्रदेश सचिव मा. दिवाकर माने यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन दिले. या वेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष मा.वसंत मुळे, रिपाईचे जिल्हासरचिटणीस मा. बाबासाहेब वाहुळे, सुरेश वाढे, मिलींद कवाने, सुशील इंगोले, उत्तम इंगळे, बाबुराव कांबळे, शिवाजी पाईकराव, चंद्रकांत फुंडसे, काळुराम मोरे, गौतम तुरुकमाने, भास्कर खरे, अनिरुद्ध इंगळे, रमेश इंगोले, दत्तराव गायकवाड, दाजीबा चाटसे, आनंदा अंभोरे, गौतम चाटसे, विलास कवाने, अर्जुन मौरे, गौतम मौरे, आदींची उपस्थिती होती.

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: