आरोग्यइतरऔरंगाबादमराठवाडाराज्य

अपंगांसाठी विशेष कक्षाची स्थापना; प्रहारच्या आंदोलनास यश

Spread the love

किर्ती म. विटेकर, (औरंगाबाद) – महानगर पालिकेमध्ये 1 मे रोजी दिव्यांग सेवा कक्षाची स्थापन करण्यात आली. दिनांक 18 एप्रिल रोजी आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली मनपा इमारतीस घेराव अांदोलन करण्यात आले होते. त्यात ही एक मागणी करण्यात आली होती. स्वत:हा बच्चु कडु आल्याने अंपंगाच्या मागण्यांकडे काळजीपूर्वक महापौरांनी बघीतले.
या कक्षाद्वारे अपंगांच्या सर्व योजनांची अंमलबजावणी एकाच ठिकाणी होणार असून अपंगांची दमछाक कमी होणार आहे. उदघाटन प्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले व स्थायी समिती सभापती गजानन बारवाल उपायुक्त निकम साहेब उपायुक्ताचे स्वीय सहायक सतिश सैर व मनपाचे अनेक कर्मचारी हजर होते. याचे उद्घाटन प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबाद चे शहर अध्यक्ष दत्ता साळकर व उमेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे, तालुका अध्यक्ष राम फुकटे विजय नागरे व प्रहार सैनिक हजर होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: