औरंगाबादमराठवाडाराज्य

अनधिकृत किटक नाशके आणि विद्रव्ये खते साठवणार्‍या कंपनीचा पर्दाफाश

Spread the love

कैलास खेडकर, (औरंगाबाद) – नाशिक महामार्गावर औरंगाबाद शहरापासून 10 कि.मी. अंतरावरील शेरणापुर माळीवाडा रस्त्याच्या 100 फुटावर गट नं( 78) एक गोडाऊन आहे.  त्यांनी गणेश गवते यांना भाडेतत्वावर दिलेले आहे. या गोडाऊन मध्ये सेजल ग्लास पावडर बनवणाऱ्या कंपनीचा बोर्ड लावलेला आहे. ही कंपनी मागच्या बाजूला चालू आहे. तर गोडाऊनच्या अर्ध्या भागा मध्ये प्लायबोर्डे लावून कीटक नाशकचा साठा होता. कंपनी अनेक दिवसा पासून सुरु होती. ग्लास कंपनीचा बोर्ड असल्यामुळे कोणाचेही याकडे लक्ष जात नव्हते.
अनअधिकृत कीटक नाशक विद्रव्ये कंपनी सुरु असल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती मिळाली अधिकार्‍यांनी दि 27 शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून सापळा लावला. खात्री पटल्यानंतर लगेच छापा मारण्यात आला. या वेळी मोठया प्रमाणात नकली बी बियाणे आढळून आले. या नंतर या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनला देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मोजमाप घेण्यात आले. रात्र जास्त कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे मोजमाप करणे शक्य नव्हते या नंतर तीन वाजता कंपनीला सील करण्यात आले व दौलताबाद पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. दि 28 शनिवारी दुपारी पुन्हा कृषी अधिकारी व कर्मचारी गोडाऊनवर पोहचून मोजमाप करण्यास सुरुवात करण्यात आली. यात सील करण्यासाठी लागणारी मशीन व मोजमाप करण्यासाठी लागणारा इलेक्ट्रिनिक काटा अनेक कंपनीचे लेबल असलेल्या पेकिंग प्लास्टिक पिशव्या सापडल्या. सापडलेला मुद्देमाल संदर्भात प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.
या कारवाईत सहभागी झालेले कृषी अधिकारी आनंद गंजेवार जिल्हा विकास अधिकारी, मोहीम अधिकारी श्रीकांत देशपांडे,जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी आशिष काळूसे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिनकर जाधव, रोहिदास राठोड तालुका कृषी अधिकारी, राम बेंबरे तालुका कृषी अधिकारी, सुदर्शन मातीमवर तालुका कृषी अधिकारी, शकील पटेल तालुका कृषी अधिकारी, चितळेकर मँडम
सुदैवाने हा अनिअधिकृत साठा लवकर सापडला नाही. तर, बाजारामध्ये आला असता तर नाहक शेतकर्‍याचे नुकसान झाले असते. यात मिळालेले कीटक नाशक 1)फिरोकोन 2) कोट्रक्स (3)क्रेलोरी पयटी फॉस(4)मोनो क्रोटो क्रॉस(5)मारिया 71(6)मिथिल परेथॉन(8)किरो टेकसोस(9)कार्बो फिटोम(10)केलवन रेड(11)अमेड अलोपिड अशी आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: