गुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

चाकण उद्योगनगरीत पुन्हा धारदार हत्यारांचा थरार

Spread the love

रोहिदास गाडगे, (चाकण-पुणे) –  चाकण उद्योगनगरीत पुन्हा धारदार हत्यारांचा थरार झाला आहे.  कुरुळी येथील भरदिवसा कुंभार भट्टी येथे बागडे यांच्या घरात घुसून मुलास व पत्नीस मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  बागडेंवर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले असुन, तीघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. घटनेचे गांभीर्य पाहून चाकण पोलीस घटनास्थळी  दाखल झाले आहेत.
 
बागडे कुटुंबातील एैश्वर्या बागडे या मुलीचा ३० एप्रिल रोजी विवाह आहे. चार दिवस बँकेला सुट्टी असल्याने बागडे कुटुंबाची लग्नाची लगबग सुरु असताना अचानक त्यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चडविला. या हल्ल्यामध्ये नववधु सह भाऊ वैभव बाळासाहेब बागडे आई स्वाती बागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाच्या तयारीसाठी सोने दागिन्यांवर पाळत ठेवुन हा हल्ला झाल्याचा अंदाज असून हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.
लग्न घरात अनेक दागिन्यांच्या महागड्या वस्तु व पैसे याची पाळत ठेवत हल्लेखोर घरापर्यंत आले आणि अचानक घरामध्ये प्रवेश करत  बंधुक, कोयताचा धाक धाकवुन शांत खाली बसण्यास सांगितले. जखमींवर चाकण येथील साईनाथ हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे चाकण पोलीसांची एक टिम घटनास्थळी पोहचली असून, अज्ञात हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
दरम्यान चाकण उद्योगनगरी परिसरात पैशासाठी माणुसच माणसाच्या जिवावर उठला असताना हे सारं थरारकच आहे. लग्न कार्य असणा-या घरावर पाळत ठेवुन अशा पद्धतीने हल्ला होणं हे गंभीरच आहे. या अशा चाकण उद्योगनगरीतील घटना कधी व कोण थांबविणार हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन विचारला जात आहे
 

Tags

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: