इतरगुन्हेविश्वपरभणीमराठवाडाराज्यसामाजिक

पाथरी पोलीसात दारू विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

रमेश बिजुले, (पाथरी/परभणी) – गावात दारु बंदी असतांना एका अवैध दारू विक्रेत्याने गोदाकाठावर गावठी हातभटटी दारू काढून विक्री सुरु केल्याने गावातील संतप्त महीला व पुरुषांनी आक्रमक पवित्रा घेत दारू काढण्यासाठीचे साहीत्य जप्त करुन पाथरी पोलीसात दारू विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना सोमवार २३ एप्रील रोजी पाथरी तालूक्यातील लिंबा येथे घडली.
तालूक्यातील लिंबा येथे अवैध हातभटटी दारु दारु पिऊन गावामध्ये सतत वाद निर्माण होऊन भांडणांचे प्रमाण वाढल्याने गावातील महीलांनी पुढाकार घेत गावातील दारू विक्री बंद केली होती. परंतू एक वर्षा पासुन बंद असलेली दारू तालूक्यातील डाकू प्रिंप्री येथील २३ वर्षीय बंडू प्रभू सोनवने याने पुन्हा सुरू केल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थता बिघड्याने ग्रामस्थांनी बंडू सोनवने यास दारू विक्री बंद करण्याची अनेक वेळा समज दिली परंतू बंडू सोनवने ने दारु विक्री सुरूच ठेवल्याने अखेर सोमवार २३ एप्रील रोजी गावातील संतप्त महीला व पुरुषांनी थेट दारू बनवण्याच्या गोदाकाठावरील स्थळावर ह्ल्लाबोल करताच ग्रामस्थांची आक्रमकता पहात बंडू सोनवने ने दारु बनवण्याचे साहीत्य जाग्यावरच ठेवुन तेथुन पळ काढल्याने ग्रामस्थांनी साहीत्य ताब्यात घेऊन थेट पाथरी पोलीस ठाणे गाठले व सदरील प्रकाराची माहीती दिली या प्रकरणी लिंबा येथील निलाबाई सहजराव यांनी पाथरी पोलीसात दिलेल्या तक्रारी वरुन दारू विक्रेता बंडू सोनवने याच्या विरोधात मुंबई दारुबंदी 65 ई कायदयाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास सपोउनि गुलाब कालापहाड हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: