परळीत भाजपची भव्य विजयी संकल्प रॅली; पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची उपस्थिती

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
दत्ता आळणे, (परळी-बीड) – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डाॅ प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरात भाजपच्या वतीने ‘न भूतो, न भविष्यति’ अशी भव्य ‘विजयी संकल्प रॅली’ काढण्यात आली. हजारो मोटरसायकल सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘ फिर मोदी को लाना है, देश को बचाना है ‘ या गाण्याने सर्वत्र उत्साह संचारला होता.
केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी केलेल्या कामा विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज जिल्हयातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. परळी शहरात पालकमंत्री पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४.३० वा. गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून ही रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीत मतदारसंघातील भाजपचे गावोगांवचे हजारो कार्यकर्ते आपल्या मोटरसायकल सह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गोपीनाथ गड येथून निघालेली ही रॅली तळेगांव, टोकवाडी, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुल, आर्यसमाज, राणी लक्ष्मीबाई टाॅवर, गणेशपार, अंबेवेस, तळ, पुन्हा टाॅवर, स्टेशन रोड, एक मिनार चौक, बस स्टँड, योगेश गार्डन, ना. पंकजाताई मुंडे यांचे कार्यालय, शिवाजी चौक, वडार काॅलनी मार्गे वैद्यनाथ मंदिर येथे आली व त्याठिकाणी रॅलीचा समारोप झाला.
नागरिकांकडून भव्य स्वागत
गोपीनाथ गड ते वैद्यनाथ मंदिर मार्गावर ठिक ठिकाणी रस्त्यावर नागरिकांनी रॅली थांबवून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत केले. रॅलिविषयी जनतेच्या मनात असलेली कमालीची उत्सुकता यावेळी दिसून आली. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे यांनी खुल्या जीपमधून नागरिकांना हात उंचावून अभिवादन करत त्यांचे स्वागत स्विकारले. रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल वर असलेला भाजपचा झेंडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता याशिवाय अग्रभागी ‘फिर मोदी को लाना है, देश को बचाना है’ या गाण्याने सर्वत्र उत्साह संचारला होता. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात वाहतुकीच्या नियमांचे पालन करत रॅलीचा थाटात समारोप झाला.
भाजपने केला विजयाचा संकल्प
या विजयी संकल्प रॅलीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जोश भरला आहे. आम्ही तर विजयाचा संकल्प केला आहे. जिल्हयातील सहाही मतदारसंघात विजय तर होणारच आहे पण त्यापूर्वी बीडमध्ये दबंग खासदार डाॅ प्रितम मुंडे पुन्हा विजयी होणार आहेत. मुंडे साहेबांच्या या जागेवर इथली जनता दुस-या कुणालाही पाहू शकत नाही असे सांगून पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केले असून विविध विकास योजना त्यांच्यासाठी राबविल्या आहेत, संपूर्ण जनमत सध्या भाजपच्या बाजूने असल्याने केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार शंभर टक्के येणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यां समोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज बीड व गेवराई येथे विजयी संकल्प रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.
खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!