चंद्रपूरराज्यविदर्भ

चिमूर तालुका काँग्रेस तर्फे आजच्या शिवाजी पुस्तकाचा निषेध

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(चिमूर) –  चिमूर तालुका कांग्रेस कमेटी व महाविकास आघाडी च्या वतीने बुधवारला आज का शिवाजी पुस्तकाचे प्रकाशनाचे निषेधार्थ उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाद्वारे आज का शिवाजी या पुस्तकात महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रकार आहे. महापुरुषांची बरोबरी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता करू शकत नाही.

महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांचे या पुस्तकाच्या प्रकाशनाने मन दुखावले गेले आहे. या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाने सर्व भारतवासी व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी.

राज्य सरकारने हे पुस्तक महाराष्ट्रात प्रकाशित करू नये. केंद्र सरकारने या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून लेखकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुका कांग्रेस कमेटी चिमूर व महाविकास आघाडी करीत आहे.

निवेदन देतांना अध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमेटी माधव बिरजे माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल डगवार, उप जिल्हाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस राजू मुरकुटे, विजय डाबरे, उपाध्यक्ष तालुका कांग्रेस विजय डाबरे,अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस योगेश ठुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे,माजी पंचायत समिती सदस्य ओम खैरे, उपनगराध्यक्ष तुषार शिंदे, धनराज मालके, नगरसेवक विनोद ढाकुणकर, अॅड. अरूण दुधनकर, तुषार काळे,धनंजय बिंगेवार, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंगेश बारापात्रे विनोद राऊत संदीप रामगुंडे जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तालुका राजू चौधरी,शिवसेना उपशहर प्रमुख संजय पडोळे,उपाध्यक्ष युवक तालुका काँग्रेस चंद्रशेखर गिरडे, सुभाष गोठे, चंद्रभान सावसाकडे, जगमित्र लोखंडे, बालाजी नन्नावरे, आदी महाविकास आघाडी व काँग्रेस पदाधीकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: