इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

दोन अस्वली शेतातील विहीरीत पडल्या

- सावरी बीडकर येथील घटना

Spread the love

निखिल खानोरकर,महाराष्ट्र विश्व न्यूज,(चिमूर) – बोर खायच्या निमीत्ताने शेतात आलेल्या दोन अस्वली शेतातील विहीरीत पडल्या हि घटना मंगळवार दुपारी अडीज वाजता सावरी बीडकर गावापासुन एक किमी अतंरावर असलेल्या राजेंद्र निकोसे यांच्या शेतात घडली.

चिमूर वन परिक्षेत्र अतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेत शिवारात मंगळवार ला दुपारच्या दरम्यान शेतातील बोरीच्या झाडावर बोर खान्याच्या दृष्टीने चढन्याच्या प्रयत्नात झाडाला लागुन असलेल्या शेतातील विहीरीत पडल्या शेतमालक विहीरीकडे जात असताना खळबळ खुळबळ आवाज आल्याने विहीरीत डोकावुन पाहत असताना दोन अस्वली विहीरीत पोहत असताना दिसल्या असता त्याने गावाकडे पळ काढला गावातील नागरीकांना हकीकत सांगीतली व चिमूर वनपरिक्षेत्र यांना माहीती कळविली.

घटनास्थळी चिमूर वनपरिक्षेत्राची टिम पोहचली. त्यांना काढन्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भावीक चिवंडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र गावकऱ्यांनी त्यांना पिंजऱ्यात पकडुन जंगलात सोडन्याची मागनी केली रात्र झाल्यामुळे वनविभागाचा पहारा शेतात लावन्यात आला आहे. गावकऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: